Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरी

Rain Update in Khandesh : खानदेशात सोमवारी (ता. १०) सायंकाळी व रात्री अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत मध्यरात्रीनंतर हलका ते मध्यम पाऊस झाला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सोमवारी (ता. १०) सायंकाळी व रात्री अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत मध्यरात्रीनंतर हलका ते मध्यम पाऊस झाला. शेतकरी मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असून, या पावसाने पेरणीला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

खानदेशात मागील सात ते आठ दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस येत होता. परंतु सर्वदूर हा पाऊस नव्हता. हा पाऊस जेथे आला, तेथे वादळही होते. यामुळे केळी, भाजीपाला व अन्य पिकांची हानी झाली आहे.

तसेच विजेचे खांब वाकून वीजपुरवठा खंडित होण्याची समस्याही तयार झाली. परंतु हा पाऊस सर्वदूर नव्हता. प्रचंड उष्णता मागील काही दिवस खानदेशात होती. सकाळी ढगाळ वातावरण असायचे.

दुपारी ऊन तापायचे आणि सायंकाळी किंवा रात्री काही भागांत वादळी पाऊस यायचा. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतीच्या मशागतीच्या कामास सुरुवात केली. परंतु काही भागांत अगदी तुरळक पाऊस असल्याने उष्णताच वाढत होती.

यामुळे शेतकऱ्यांत पेरणीची फारशी तयारी, लगबग नव्हती. परंतु सोमवारी खानदेशात अपवाद वगळता सर्वदूर पाऊस झाला. काही धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार, शहादा, जळगाव जिल्ह्यांतील धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव, बोदवड आदी भागांत सोमवारी रात्री मध्यम ते हलका पाऊस झाला.

कुठेही अतिजोरदार किंवा जोरदार पाऊस नव्हता. चोपडा तालुक्यातील पूर्व, उत्तर भागात सोमवारी सायंकाळी चांगला पाऊस झाला. शेतात पाणी साचले. परंतु अन्य भागांत मध्यम पाऊस होता. काही महसूल मंडलांत १० मिमी तर काही मंडलांत ३० मिमीपर्यंत पाऊस झाला आहे.

जळगाव, धरणगाव, चोपडा भागांत सोमवारी मध्यरात्रीनंतर भिज पाऊस झाला. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंत तुरळक पाऊस जळगाव, धरणगाव, एरंडोल भागात सुरू होता. पावसाळी वातावरणाने गारवाही आला.

ग्रामीण भागात मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा बंद झाला. मंगळवारी सकाळी अनेक भागांत वाफसा नव्हता. यामुळे शेतीकामे ठप्प झाली. पेरणीचे कामही मंगळवारी कुठेही सुरू नव्हते.

केळी काढणीवर भर

पावसामुळे अनेक शेतरस्ते खराब होतात. केळीची काढणी रखडते. यामुळे शेतकऱ्यांनी रविवारी व सोमवारी केळीची काढणी करून घेतली. कोरड्या वातावरणात काढणी केल्याने वाहतुकीसंबंधीची अडचण आली नाही. सोमवारी अनेक भागांत किंवा सर्वत्र पाऊस आल्याने शेतरस्ते खराब झाले आहेत. यामुळे केळीची काढणी रखडत होईल, अशी स्थिती खानदेशात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार कराराच्या वाटाघाटी आजपासून

Kharif Sowing Advisory: पेरण्यांची घाई करू नये : मुख्यमंत्री फडणवीस

Seafood Product Export: सागरी उत्पादनांची विक्रमी निर्यात; देशाच्या परकीय चलनात ७३ हजार कोटींची कमाई

Crop Loan Waiver: कर्जमाफीची आज घोषणा?

Pakistan Sugar Production: पाकिस्तानातही अतिरिक्त साखरेचे संकट; निर्यातीला मंजुरी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT