Maharashtra Winter: उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. आज (ता. २९) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..उत्तर अंतर्गत कर्नाटक, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण गुजरातपर्यंत १.५ किलोमीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, अंदमान समुद्रात आज (ता. २९) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत..राज्याच्य किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असल्याने शनिवारी (ता. २८) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात १२ अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १३.५ अंश, नागपूर येथे १३.८ आणि वर्धा येथे १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर नाशिक आणि यवतमाळ येथे १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १५ अंशांपेक्षा अधिक होते..Maharashtra Winter Weather: राज्यात तापमानात चढ-उतार; थंडी कमीच.राज्याच्या कमाल तापमानात वाढ-घट होत असून, ढगाळ हवामानमुळे उकाडाही कायम आहे. शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर, सातारा, सांताक्रूझ आणि रत्नागिरी येथे कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे होता..आज (ता. २९) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भाच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Maharashtra Weather: तापमानात चढ-उतार शक्य.शनिवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.५---१७.१अहिल्यानगर---३१.६---२०.३धुळे---३३.०---१२जळगाव---३२.५---१८जेऊर---३४.५---२०कोल्हापूर---३२.४---२२.१महाबळेश्वर---२८.१---१६.८नाशिक---३३.१---१४.६.निफाड---३३.४---१३.५सांगली---३३.०---२२.३सातारा---३४.३---१८सोलापूर---३६.८---२२.५सांताक्रूझ---३४.५---१७.८डहाणू---३०.६---१८रत्नागिरी---३४.९---२१.२छत्रपती संभाजीनगर---३३.०---२०धाराशिव---३१.१---१९.१परभणी---३३.२---१९.४परभणी (कृषी)---३२.५---१७.९.अकोला---३३.१---१९.४अमरावती---निरंक---१६.१ब्रह्मपूरी---३०.५---१५.४बुलडाणा---३१.८---१८.५चंद्रपूर---३२.८---१७गडचिरोली---३१.२---१५.४गोंदिया---२९.२---११.६नागपूर---३०.२---१३.८वर्धा---३१.५---१४वाशीम---३२.२---१७.४यवतमाळ---३१.८---१४.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२---३३.४पश्चिम महाराष्ट्र---१५.३---३६.८कोकण---१८---३४.९मराठवाडा---१७.९---३३.२विदर्भ---११.६---३३.१राज्यात गारठा कायम असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) :गोंदिया ११.६, धुळे १२, निफाड १३.५, नागपूर १३.८, वर्धा १४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.