Pune News : पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि विदर्भातील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत सर्वदूर, तर अकोला, वर्धा जिल्ह्यांत काही ठिकाणी रविवारी (ता. ११) हलका पाऊस झाला.
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत साताऱ्यातील महाबळेश्वर येथे ६८ मिलिमीटर पाऊस झाला. परंतु पावसाचा अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने धरणांतील पाण्याचा विसर्ग घटवला आहे. कोकणात ठाणे जिल्ह्यातील धसइ येथे ४६ मिलिमीटर पाऊस झाला. तर शहापूर, किनहवळी, डोळखांब येथे ४२ मिलिमीटर पाऊस झाला.
रायगडमधील पाली येथे ३८, महाड, नाटे, तुडली येथे ४२ मिलिमीटर पाऊस झाला. पोलादपूर, कोंडवी, वाकण मध्यम पाऊस झाला. अनेक ठिकाणी हलका सरी कोसळल्या. रत्नागिरीतील शिरगाव, सौंदळ, पाचल येथे ३०, तर सिंधुदुर्गमधील देवगड, पडेल, वैभववाडी, भुईबावडा, ३०, श्रावण येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी झाला आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील धारगाव येथे ३२, पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे ३३, तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे ४५ मिलिमीटर पाऊस झाला. नगर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पाऊस नसला तरी काही ठिकाणी अधूनमधून सरी बरसल्या आहेत. मराठवाड्यातील सर्वंच भागात पावसाने उघडीप दिली आहे.
बीडमधील धारूर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. विदर्भातील बुलडाण्यातील जळगाव, जामोद, कळे, कवठळ, शेगाव, आसलगाव येथे ४८, वडशिंगी ४१, संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर २१, पातुर्डा २६, माटरगाव, नांदूरा येथे २७ मिलिमीटर, अकोल्यातील पणज येथे ४३, तर आसेगावमध्ये ४६ मिलिमीटर पाऊस झाला.
अमरावतीत जोर ओसरला
अमरावतीतील हरीसळ, सेमडोह, वडनेर, शिरखेड ४४, पूर्णानगर, असेगाव, भांडराज ४३, रिद्धापूर ४९, रासेगाव ६१, चांदूर ४५, बेलोरा ४१, करजगाव ४२, वर्ध्यातील अंतोरा येथे ४४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाल्यातील पाण्याची पाणीपातळी किंचित कमी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.