Rain Update
Rain Update Agrowon

Rain Update : दोन महिन्यांत १२६ टक्के पाऊस

Pune Rain News : यंदा साधारणपणे सात जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
Published on

Pune News : जिल्ह्यात जून, जुलै या दोन महिन्यांत सरासरीच्या ४८५.५ मिलिमीटरपैकी ६१४.५ मिलिमीटर म्हणजेच १२६ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये वेल्हा येथे सर्वाधिक ३,४७९ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ८६१.६ मिलिमीटर एवढी आहे. जून महिन्यातील पावसाची सरासरी १७६.२ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी यंदा जूनमध्ये १७१.४ मिलिमीटर म्हणजेच ९७.३ टक्के पाऊस पडला.

तर जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ३०९.३ मिलिमीटर एवढी असून, त्यापैकी चालू वर्षी ४४३.२ मिलिमीटर म्हणजेच १४३ टक्के पाऊस झाला आहे. यंदा जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी अवघा ९०.७ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के पाऊस पडला. तर, जुलै महिन्यात सरासरीच्या ३०९ मिलिमीटरपैकी २८१.१ मिलिमीटर म्हणजेच ९० टक्के पाऊस झाला होता. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याचे दिसून येते.

Rain Update
Monsoon Rain : जळगाव जामोद, शेगाव तालुक्यात यंदा पाऊस जोरावर

यंदा साधारणपणे सात जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कमी-अधिक होता. काही धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता.

Rain Update
Rain Update : पूर्व विदर्भ, कोकणात पावसाच्या जोरदार सरी

यात मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे चासकमान, भाटघर, वीर, कळमोडी, खडकवासला, उजनी अशा धरणांत नव्याने पाण्याची आवक झाल्याने जवळपास धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात जून, जुलै महिन्यांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हवेली ः पुणे वेधशाळा, केशवनगर ५९२, कोथरूड ७७७, खडकवासला ७४८, थेऊर ३६९, उरुळीकांचन २९७, खेड ७१९, भोसरी ३७६, चिंचवड २७५, कळस ३४९, हडपसर ४३२, वाघोली ३५१, अष्टापूर ३११

मुळशी ः पौड १४७६, घोटावडे ११५४, थेरगाव ५९९, माले १७६७, मुठे २२४८, पिरंगुट ७७३.

भोर ः भोर ८६८, भोलावडे १५०२, नसरापूर ९९४, किकवी ५२३, वेळू ७४२, आंबवडे ९२७, संगमनेर ६२४, निगुडघर १४९८

मावळ ः वडगाव मावळ ८०९, तळेगाव ६५१, काले १३७७, कार्ला ३०२०, खडकाळा १३२१, लोणावळा २४९०, शिवणे १०१०

वेल्हा ः वेल्हा ३४७९, पानशेत २१०९, विंझर १४२८, आंबवणे १०५२.

जुन्नर ः जुन्नर ३१४, नारायणगाव २५६, वडगाव आनंद २७१, निमगाव सावा २१५, बेल्हा २४१, राजूर ५२१, डिंगोरे ४१०, आपटाळे ४३४, ओतूर २५७

खेड ः वाडा ६०७, राजगुरुनगर ३६३, कुडे ६१८, पाईट ६१४, चाकण ४६८, आळंदी ३३०, पिंपळगाव ३३५, कन्हेरसर ३६०, कडूस ३९५.

आंबेगाव ः घोडेगाव ३६४, आंबेगाव २१०७, कळंब २५६, पारगाव १७२, मंचर २४७.

शिरूर ः टाकळी हाजी १८७, वडगाव २२५, न्हावरा ४०६, मलठण २४७, तळेगाव ३८४, रांजणगाव ३०३, कोरेगाव २५६, पाबळ ३०४, शिरूर ३५४.

बारामती ः बारामती ३२८, माळेगाव २३७, पणदरे २३४, वडगाव २९३, लोणी ३०७, सुपा ३१९, मोरगाव ३४५, उंडवडी ३६४

इंदापूर ः भिगवण १८४, इंदापूर १९५, लोणी ३४०, बावडा २८४, काटी ३२२, निमगाव ३२४, अंथुर्णी २६४, सणसर ५५०.

दौंड ः देऊळगाव २४५, पाटस ४५९, यवत २३०, कडेगाव ३३७, राहू ३०६, वरवंड ३६८, रावणगाव ३२८, दौंड ४४८, बोरी बधक ३०२, खामगाव ३६४, पारगाव ४०६, बोरी पार्धी ३०७.

पुरंदर ः सासवड ४३२, भिवंडी ३०१, कुंभारवळण ३४०, जेजुरी २३८, परिंचे २२८, राजेवाडी ३१५, वाल्हा १९९

(स्रोत - कृषी विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com