Rain Update
Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain : मराठवाड्यात बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज

Team Agrowon

Parbhani News : मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यांत सोमवार (ता. ६) ते बुधवार (ता. ८) तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) ग्रामीण कृषी मोसम सेवा मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी (ता. ६), मंगळवारी (ता. ७), बुधवारी (ता. ८) तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात सोमवारी (ता. ६), मंगळवारी (ता. ७) तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर बुधवारी (ता. ८) तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

परभणी जिल्ह्यात सोमवारी (ता. ६) आणि बुधवारी (ता. ८) ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर मंगळवारी (ता. ७) तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात सोमवारी (ता. ६), मंगळवारी (ता. ७), बुधवारी (ता. ८) तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी (ता. ७), बुधवारी (ता. ८) तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. ७) तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेला माल गोळा करून पॉलिथिन शीटने ताडपत्रीने झाकून ठेवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सून १९ मे रोजी अंदमानात येणार

Livestock Registration : जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करा : डॉ. बोर्डे

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

SCROLL FOR NEXT