Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Water Crisis Amaravati : यंदाही पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा व पूरक आराखड्यात सुमारे १ हजार ८७ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या.

Team Agrowon

Amaravati News : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने मेळघाटमधील पाणीटंचाई ओसरल्याचे चित्र असून टॅंकर तसेच विहीर अधिग्रहणाच्या टेन्शनपासून प्रशासनाची मुक्तता झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसोबतच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

गत मार्च महिन्यापासून ग्रामीण भागात पाणीटंचाईने पाणीपुरवठा विभागाचे टेन्शन वाढविले होते. आता मात्र पावसाळा सुरू होताच मेळघाटातील १२ गावांतील टँकरचे आणि १७० गावांतील विहीर अधिग्रहणाच्या संकटातून मुक्तता झाली आहे. परिणामी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत मेळघाटसह गैरआदिवासी भागात नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात पाणीटंचाई आराखडा तयार करून विविध उपाययोजना केल्या जातात.

यंदाही पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा व पूरक आराखड्यात सुमारे १ हजार ८७ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. यामध्ये नळयोजना विशेष दुरुस्तीच्या २०२ पैकी १८८ उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याशिवाय तात्पुरती पूरक नळ योजनेची ३०, टँकर २१, विहीर अधिग्रहण ४९३, नवीन विंधन विहीर, कूपनलिका २९१, विहीर अधिग्रहण ४८३ याप्रमाणे योजना प्रस्तावित केल्या होत्या.

त्यानुसार १ हजार ८७ पैकी ३७४ उपाययोजनांना मंजुरी मिळाली होती. यामधून १० उपाययोजना प्रगतिपथावर होत्या. २५ उपाययोजना रद्द करण्यात आल्या, तर ३४० उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत.

जून महिन्यापर्यंत या सर्व उपाययोजनांची कार्यवाही आटोपल्यानंतर जुलैपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावताच ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ सुरू असलेल्या २१ टँकरची व १२३ विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यातून सुटका झाली आहे.

परिणामी आता मेळघाटसह ग्रामीण भागातील पाणीटंचाई मिटली असून पाणीपुरवठा विभागाचे टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचे टेन्शन मिटले आहे.

या गावात सुरू होते टँकर

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा (शहापूर), तारुबांदा, गौलखेडा बाजार, मेहरीआम, बहादरपूर, धरमडोड, गवळीढाणा कोरडा, आलाडोह, खिरपाणी आणि चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आदी गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता मात्र या सर्व गावांतील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. परिणामी आता मेळघाट व अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेले टँकर व विहीर अधिग्रहणाची समस्या मिटली आहे.
- स्नेहा धावडे उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT