Rain Update
Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. यात पिकांसह पशुधनाची हानी होत असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे मोहन चव्हाण यांची बैलजोडी वीज कोसळून मृत्युमुखी पडली. ही घटना चिंचखेडा बुद्रुक शिवारात घडली. सुदैवाने शेतकरी चव्हाण घरी होते. सोमवारी (ता.१३) सकाळी मुक्ताईनगर व परिसरात सुसाट वाऱ्यासह पाऊस झाला. यात केळीची हानी झाली. शेतकरी चव्हाण हे आपल्या बैलजोडीसह शेतीकामांसाठी चिंचखेडा शिवारातील शेतात गेले. परंतु पाऊस सुरू झाला.

काम थांबवून चव्हाण बैलजोडी झाडाखाली बांधून घरी धावपळ करीत पोहोचले. अशातच शेतात झाडावर वीज कोसळली व त्यात बैलजोडी मृत्युमुखी पडली. तलाठी व पशुधन विकास अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. बैलजोडी मृत्युमुखी पडल्याने दीड लाखांचे नुकसान झाले आहे. वित्तीय संकटात असतानाच ही घटना घडल्याने चव्हाण हे अडचणीत आले आहेत.

खानदेशात धुळे, नंदुरबार व जळगावात सोमवारी अनेक भागांत वादळी पाऊस झाला. मोठे नुकसान यात केळी, भाजीपाला पिकांचे झाले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबारातील शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार भागांत वादळी पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. केळीबागा आडव्या झाल्या असून, पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.

बाजरी मळणीत अडचणी

मागील पाच ते सहा दिवस खानदेशात विविध भागांत वादळी पाऊस होत आहे. बाजरी मळणी व शेतीची पूर्वमशागत सुरू आहे. या कामातही अडचणी येत आहेत. सकाळी ढगाळ वातावरण असते. दुपारी उष्णता वाढते व सायंकाळी पाऊस येतो. वेगाचा वारा असतो, अशी स्थिती खानदेशात सर्वत्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Farming : तेंडोळीच्या वानखडे यांनी धरली फळबागांची कास

Crop Insurance : पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाची सूचना, नावातील किरकोळ बदल गाह्य

Floriculture Technology : पावसाच्या प्रदेशात यशस्वी पॉलिहाउसमधील जरबेरा

Landslides In Kolhapur : भूस्खलनाचा धोका! कोल्हापुरातील अनेक गावांना सूचना

Kajwa Mahotsav : काजव्यांना नष्ट करणारा महोत्सव

SCROLL FOR NEXT