Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाचा जोर कमी; अनेक मंडलांत हजेरी कायम

Unseasonal Rain : मराठवाड्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर कमी असल्याचे पाहायला मिळाले.

Team Agrowon

Chhatarapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर कमी असल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाचही जिल्ह्यातील अनेक मंडलात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची हजेरी मात्र कायम होती.

गत तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७१ मंडलात पावसाची तुरळक, हलकी तर काही मंडलात मध्यम हजेरी लागली.

जालना जिल्ह्यातील ३५ मंडलात पावसाची हजेरी लागली. भोकरदनमध्ये ८, जाफराबादमध्ये २, जालन्यात २, अंबडमधील ७, परतुरमधील २, बदनापूरमधील ५, घनसावंगीतील ७ तर मंठ्यातील दोन मंडलात तुरळक हलका पाऊस झाला.

बीडमधील ४४ मंडलात पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये बीड तालुक्यातील ११, पाटोद्यातील चार, आष्टीतील सात, गेवराईतील १०, माजलगावमधील तीन, अंबाजोगाईतील एक, केजमधील तीन, परळीतील एक वडवणीतील एक व शिरूर कासार मधील तीन मंडलांचा समावेश आहे.

पाटोदा,आष्टी, बीड व शिरूर कासार तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. लातूर जिल्ह्यातील २५ मंडलात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. त्यामध्ये लातूर तालुक्यातील सात, अहमदपूरमधील चार, उदगीरमधील पाच, चाकूरमधील सहा, रेणापूरमधील दोन, देवणीतील एका मंडलाचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातील १५ मंडलात पावसाची हजेरी लागली त्यामध्ये धाराशिव तालुक्यातील दोन, परांडातील पाच, भूममधील पाच, व वाशीतील तीन मंडलांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment Date: शेतकऱ्यांना दिवाळीत पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळेल का?; तपासा तुमचे लाभार्थी स्टेटस

Crop Insurance Payment : सिंधुदुर्गात बागायतदारांना विमा वितरणास सुरुवात

Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे सुरूच; कमी मनुष्यबळाचा परिणाम

Agrowon Podcast: शेवगा तेजीतच, सोयाबीन दर कमीच, बीटला उठाव, वांगी दर टिकून तर सीताफळ आवक स्थिर

Rabi Sowing : रब्बी पेरणी रखडत दीपोत्सवानंतर वेग शक्य

SCROLL FOR NEXT