Rabi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Dryland Rabi Crop : कोरडवाहू रब्बी पिके जोमात; हरभरा, ज्वारीला पावसामुळे वरदान

Rabi Season : खानदेशात मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसात फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसात फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही भागांत पशुधनालाही फटका बसला आहे. परंतु या पावसाने कोरडवाहू रब्बी पिकांना दिलासा मिळाल्याची स्थिती आहे.

खानदेशात पाऊसमान चांगले झाल्याने रब्बीची पेरणी बऱ्यापैकी झाली. पेरणी नोव्हेंबरमध्ये सुरू झाली. ज्यांनी कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी केली होती, त्या शेतकऱ्यांच्या पिकास पाण्याची गरज होती. कारण थंडी कमी-अधिक झाली. उष्णता ऑक्टोबरमध्ये होती. नोव्हेंबर महिन्यातही किमान तापमान १० अंश सेल्सिअसखाली काही दिवस राहिले.

कमाल दिवस किमान तापमान १३ अंश सेल्सिअसवर होते. थंडी कमी असल्याने कोरडवाहू रब्बी पिकांना सिंचनाची गरज तयार झाली होती. काही शेतकऱ्यांची पेरणी जमिनीत ओलावा नसल्याने रखडल्याने त्यांनी पूर्वमशागत करून शेत भिजविण्याची तयारी केली होती. यातच पाऊस आल्याने कोरडवाहू रब्बी पिकांना लाभ झाला आहे. तसेच शेत भिजविण्यासाठी वेळ, श्रम व पाणी खर्च करण्याची गरज नाही.

खानदेशात सुमारे २८ महसूल मंडलांत चांगला पाऊस २५ ते २९ डिसेंबरदरम्यान झाला. काही भागात हलका, मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांना लाभ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी पीक आहे.

तसेच कोरडवाहू हरभरा पीकही बऱ्याीपैकी आहे. या पिकांना बऱ्यापैकी लाभ झाला असून, पुढे वाढही जोमात होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात कोरडवाहू हरभऱ्याचे क्षेत्र ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. तर दादर ज्वारीचे क्षेत्र सुमारे १५ हजार हेक्टर एवढे आहे. ही पेरणी तापी, अनेर, पांझरा, गिरणा नदीच्या क्षेत्रात अधिक झाली असून, या भागाला लाभ होणार आहे.

सिंचन बंद

डिसेंबरच्या अखेरीस पाऊस झाल्याने शेतीकामे ठप्प झाली. यातच केळी, भाजीपाला व इतर पिकांचे सिंचन बंद झाले आहे. जमिनीत बऱ्यापैकी ओलावा असल्याने वाफसा स्थिती पुढील काही दिवस कायम राहील. यामुळे किमान आठवडाभर लहान केळी, मका, ज्वारी व इतर फळ पिकाच्या सिंचनाची गरज नाही. यामुळे भूगर्भातील पाण्याची बचत होत असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT