Gondia Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Gondia Farmers : वादळी वाऱ्यासह पावसामुळे धान उत्पादकांचे नुकसान

Paddy Farmers Gondia : हार्वेस्टरने मळणी झालेले धान वाळवण्यासाठी अंगणात, कुठे रस्त्यावर, कुठे गावातील सार्वजनिक पटांगणावर, याप्रमाणे जागा मिळेल तिथे टाकण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Gondia : नवेगावबांध परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्यातच सोमवारी (ता. २६) पहाटे पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने धान पिकाचे फार मोठे नुकसान केले.

नवेगाव बांध परिसरात आज पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे कापणीस तयार असलेले धान वादळामुळे जमिनीवर लोळले. पिकाची कापणी झाल्यामुळे कडपा तसाच पडून आहे. दुसरीकडे हार्वेस्टरने मळणी झालेले धान वाळवण्यासाठी अंगणात, कुठे रस्त्यावर, कुठे गावातील सार्वजनिक पटांगणावर, याप्रमाणे जागा मिळेल तिथे टाकण्यात आले आहे. तेही आज पहाटे आलेल्या पावसाचे पाणी साचल्याने भिजून गेले असून, शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले धानपीक अवेळी पावसामुळे अक्षरशः मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही भागांत कापणी झालेल्या धान पिकांच्या कडपा पावसाचे पाणी गेल्याने सडण्यास सुरुवात सुरू झाली आहे. शेतात धानाच्या कडपा पडून आहेत. कापणी झाल्यावर पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतात पूजने तयार करून ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या सततच्या अकाली पावसामुळे पुजण्याच्या तळासी असलेल्या धानाला अंकुर फुटत आहेत.

मॉन्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीच्या कामातही खोडा निर्माण झाला आहे. खरीप पूर्वतयारीचे कामे सुद्धा झाले आहेत. ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणीचे, पारंपरिक खते टाकणे आधी कामे अशी शेतीची मशागत सध्या सुरू आहे. परंतु पावसामुळे शेतजमीन ओली झाली आहे. काही शेतात पाणी साचल्यामुळे मशागतीचे कामे ठप्प झाली आहेत.

आज सकाळी आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे धान पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतात कडपा पडलेले आहेत. सततच्या पावसामुळे धानाला अंकुर फुटत आहेत. वाळवण्यासाठी रस्त्यावर, अंगणात, पटांगणात ठेवलेले धान आजच्या पावसामुळे ओले झाले. आधारभूत धान खरेदी केंद्रावर गर्दी असल्यामुळे धान घरीच अंगणात ठेवले आहेत. ते सुद्धा ओले झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले.

- खुशाल कापगते, शेतकरी नवेगावबांध

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT