Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : राहुल गांधींचा आज नाशिकमध्ये शेतकरी मेळावा; शेतकऱ्यांशी संवाद साधणार!

नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

Team Agrowon

राहुल गांधी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बुधवारी (ता.१३) मेळावा घेणार आहेत. कांद्याचे पडलेले भाव आणि अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रा बुधवारी नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे. मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचा मेळावा राहुल गांधी यांनी`घेतला होता. तर बुधवारी सकाळी धुळे जिल्ह्यात महिलांचा मेळावा घेत संवाद साधला होता.

नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर झोडगे भागात यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉँग्रेससोबतच महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. चाळीसगाव फाटा, दरेगाव मार्गावरून राहुल गांधी यांची यात्रा मार्केट आवारात दाखल होईल. त्यानंतर चौकात सभा घेऊन रोड शो केला जाणार आहे.

या यात्रेत कॉँग्रेस नेत्यांसोबतच महाविकास आघाडीचे नेतेही हजेरी लावणार आहेत. काही दिवसातच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा १७ मार्च रोजी संपणार आहे. राहुल गांधी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे १७ मार्च रोजी सभा घेतील. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT