Bharat Dodo Nyaya Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असा प्रवास राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता मणिपुरमधून रविवार (ता.१४ रोजी) 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे. मणिपूरमधील खोंगजोम वॉर मेमोरियल येथून दुपारी १२ वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. या यात्रेचा समारोप २० मार्चला मुंबईत होणार आहे.

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय'च्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांच्या समोर जात आहेत. त्यांच्या या भारत जोडो न्याय यात्रेची सुरूवात मणिपूरची राजधानी इंफाळमधून होणार होती. मात्र त्यावर सरकारने निर्बंध घातले होते. त्यामुळे याची सुरूवात आता येथील खोंगजोम वॉर मेमोरियल येथून होत आहे. तर राहुल गांधी हे मणिपूर ते मुंबई असा ६७०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. तर यावेळी ही यात्रा पायी आणि बसने केली जाईल.

मणिपूर सरकारच्या गाईडलाईन

यावेळी मणिपूर सरकारने राहुल गांधी यांच्या या यात्रेला गाईडलाईन घालून दिल्या आहेत. त्यात, यात्रेचा कार्यक्रम हा एका तासापेक्षा जास्त नसावा, सहभागी लोकांची संख्या 3,000 पेक्षा जास्त नसावी. तर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूकीला अडथळा होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने यात्रा वळवावी असे जिल्हा अधिकाऱ्याने म्हटले आहे.

मणिपूर सरकारची दादागिरी

यावेळी मणिपूर सरकारने काँग्रेसच्या या यात्रेवरून थेट दम भरला आहे. तसेच रॅली आणि यात्रेदरम्यान कोणत्याही देशविरोधी किंवा जातीयवादी किंवा निषेधाच्या घोषणा देण्यात येऊ नयेत असे बजावले आहे. तसेच यात्रेच्या आयोजकांनी राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करताना, परिसरात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यात काही अडचण आल्यास पुढील यात्रेस परवानगी रद्द केली जाईल असेही म्हटलं आहे

मणिपूरचं का?

गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात झाला होता. येथील मेईतेई आणि कुकी समुदायांध्ये उसळलेल्या हिंसाचारात १८० लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक जायबंद झाले होते. त्यानंतर येथील राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून हा विषय हाताळताना योग्य भूमिका घेण्यात आली नव्हती. त्यामुळे 'भारत जोडो न्याय' यात्रेसाठी मणिपूर निवडण्यात आले.

कोणत्या राज्यांतून जाणार न्याय यात्रा?

या यात्रेतून राहुल गांधी जनतेपर्यंत बेरोजगारी, महागाई, सामाजिक न्याय हे विषय घेऊन जाणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने वातावरण निर्मिती ही करण्यात येणार आहे. ही यात्रा ६७ दिवसांत १५ राज्ये आणि ११० जिल्ह्यांतून जाणार आहे.

राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT