Rahul Gandhi Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi Kolhapur : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर आता राहुल गांधी येणार कोल्हापुरात

sandeep Shirguppe

Kolhapur Tour Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आली आहे. देशाचे सहकार मंत्री अमित शाह बुधवार (ता.२५) कोल्हापुरात आले होते. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर लगेच राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

गांधी यांच्या संमेलनात सहभागी असणाऱ्या सर्व संघटनांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत संविधानासंदर्भात विस्तृत चर्चा केली जाणार आहे. तसेच प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत, असं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आज गुरुवारी (ता.२६) किंवा शुक्रवारी (ता. २७) खासदार राहुल गांधी यांचे पथक कोल्हापुरात येऊन पाहणी करणार आहे. कार्यक्रमस्थळ आणि परिसराची पाहणी करून सुरक्षा तैनात केली जाणार आहे. कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते श्री. गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी सर्व प्रकारची तयारी केली जात आहे.

अमित शाह यांची महाविकास आघाडी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका

‘लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाहीत म्हणून तुम्ही नाराज आहात. काँग्रेसला तीन निवडणुकीत मिळून जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तेवढ्या आपल्याला केवळ २०२४ च्या निवडणुकीत मिळाल्या आहेत. देशातील आपल्या मतांचा टक्का वाढला आहे. राहुल गांधी कशाचा अहंकार बाळगत आहेत. भाजप असा पक्ष आहे ज्याने अनेक जय पराजय पाहिले. आम्ही २ खासदारांवरून ३०० पर्यंतचा टप्पा गाठला आहे' अशी टीका अमित शाह यांनी केली.

शाह पुढे म्हणाले की, "मागील दहा वर्षांत या देशात जे कधीच घडणार नाही असे वाटत होते ते आपण करून दाखवले आहे. नक्षलवाद संपवला, दहशतवाद गाडला. नागरिकत्व सुधारणा कायदा केला. तिहेरी तलाख संपवला. देशाची अर्थव्यस्था जगातील ५ व्या क्रमांकावर नेली. ३७० कलम रद्द केले. राम मंदिर बांधले. भाजप कार्यकर्ते मंत्री होण्यासाठी काम करत नाही. देशाला परम वैभवाला नेण्यासाठी काम करतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही केवळ राज्याची नाही. तर या निवडणुकीतील विजयाने संपूर्ण देशात उत्साह संचारणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जोशात नव्हे तर सूक्ष्म नियोजन करून गांभीर्याने लढवा. महाराष्ट्रातून शरदराव आणि कंपनीला परास्त करा." असेही श्री. शाह म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT