Rabbi Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Sowing : नाशिक जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी पेरणीची गती संथ

Nashik Rabbi Sowing : जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर तालुक्यात अवघ्या १,१४० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

Team Agrowon

Rabbi Season : नाशिक : मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यात दणका दिल्यानंतर अनेक भागांत रब्बी हंगामाच्या कामांना ब्रेक लागला होता. आता शिवारात वाफसा अवस्था झाल्यानंतर पुन्हा शिवारात कामे सुरू झाली आहेत. यंदा जिल्ह्यात पेरणीचे १ लाख १३ हजार ५७६ हेक्टर सरासरी क्षेत्र असणार आहे. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पेरण्यांची गती मंदावली होती.

सध्या मालेगाव व सिन्नर तालुक्यात पेरण्या सुरू झाल्या असून अवघ्या १,१४० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. ही टक्केवारी अवघी १ टक्का असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरण साठा समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा रब्बी पेरण्यांसह कांदा लागवडीलाही चालना मिळणार आहे.

मात्र गेल्या पंधरवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने कांदा लागवडीस विलंब होणार आहे. सध्या जिल्ह्यातून धान्य पिकांमध्ये ज्वारी व मक्याची ८९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी २४४ हेक्टरवर झाली आहे. पाऊस थांबल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला सुरू झाली आहे.

अनेक शेतांमध्ये पावसामुळे मका भिजल्याचे शिवारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कापणी झाल्यानंतरच रब्बी पेरणीला गती येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक भागांत विहिरींमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. याशिवाय धरण ही तुडुंब असल्याने व सिंचनाची खात्री असल्याने जिल्ह्यात प्रामुख्याने गहू व हरभरा पिकाचे उशिराने क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून बी-बियाणे व खतांची खरेदी टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ७५ हजार टन खतसाठ्यास मंजुरी मिळाली आहे. याशिवाय, ३६ हजार २१५ क्विंटल, तर महाबीजमार्फत आठ हजार ६०३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.

गळीतधान्य पिकांची पेरणी नाहीच

जिल्ह्यात गळीत धान्य पिकांमध्ये करडई, जवस, तीळ व सूर्यफूल या पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हेक्टर आहे. मात्र या पिकांची अद्याप पेरणी झालेली नाही. दरवर्षीच्या तुलनेत क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याचे यंदाही पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: निवडणुकीच्‍या गाळपात ऊसदराचा विसर

Rabi Subsidy Issue: अतिवृष्टीनंतर रब्बीच्याही अनुदानाचा घोळ

Watermelon Harvesting: खरीप कलिंगड काढणीला गती

Chia Cultivation: अकोला जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेतून चिया लागवडीला चालना

Agristack Registration: छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित

SCROLL FOR NEXT