Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा घटण्याची चिन्हे

Rabi Season : यंदा जून व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्याचे संकट काही ठिकाणी ओढवले होते.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. सिंचन प्रकल्पात फक्त ४२ टक्क्यांवर जलसाठा आहे. यामुळे पाणीटंचाई अनेक भागांत तयार होऊ शकते. दुसरीकडे सिंचन क्षेत्र कमी होणार असून, रब्बी हंगामातील पिकांचा पेरा घटून सुमारे पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत जाईल, असे संकेत आहेत.

२०२१, २०२२ मध्ये रब्बीचा पेरा तब्बल दीड लाख हेक्टरने वाढला होता. परंतु यंदा स्थिती बिकट बनली आहे. यंदा जून व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्याचे संकट काही ठिकाणी ओढवले होते. नंतर मात्र सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये पारोळा भागात चांगला पाऊस झाला. परंतु सिंचन प्रकल्पातील जलसाठा वाढला नाही. वाघूर धरण १०० टक्के भरले आहे.

परंतु चाळीसगावनजीकचे गिरणा धरण चांगला पाऊस न झाल्याने भरलेले नाही. कमी पाणीसाठा त्यात असून, फक्त ५६ टक्के एवढा जलसाठा आहे. सोबतच लहान मोठ्या सिंचन प्रकल्पातही फक्त ४० टक्क्यांवर पाणीसाठा आहे.

त्याचा सिंचनासाठी कमी लाभ होणार आहे. खरिपाच्या उत्पादनात पारोळा, अमळनेर, चाळीसगाव इतर भागात कमी पावसाने घट आली आहे. आता रब्बीबाबत अपेक्षा होती. परंतु जमिनीत कमी ओलावा आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फायदा फारसा होणार नाही, असे चित्र आहे.

हरभऱ्याकडे कमी खर्चामुळे कल

रब्बीची पेरणी दरवर्षी १ लाख ५५ हजार हेक्टरवर होते. २०२१ व २०२२२ मध्ये २ लाख २५ हजार हेक्टरपर्यंत रब्बीचा पेरा गेला होता. कारण पाऊसमान चांगले राहिले. परंतु यंदा कमी पावसामुळे शेतकरी कमी पाणी व कमी खर्चात येणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. सर्वांत जास्त पेरा हरभऱ्याचा होत आहे.

कपाशी काढल्यानंतर त्याच जागेवर हरभरा हे कमी पाण्यावर येणारे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यंदा ८० हजार हेक्टरवर हरभरा पेरला जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये कपाशीवर बोंड अळीची शक्यता असते.

यामुळे बहुतांश शेतकरी नोव्हेंबरमध्ये कपाशी काढून त्या ठिकाणी हरभरा पेरतील. त्या खालोखाल गहू, दादर असे उत्पन्न घेतील. पीक पद्धतीत बदल करून एकाच ठिकाणी दोन पिके घेतल्याने जमिनीचा कसही वाढण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT