Sangli News : सांगली जिल्ह्यात खरिपातील पेरणीची काढणी आटोपली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला गती आली आहे. रब्बीची पेरणी ६६ हजार २९९ हेक्टरवर झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांची काढणी आणि रब्बी हंगामातील पेरणी थांबली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पिकांची काढणी आटोपली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ४३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. परतीच्या पावसामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ खानापूर, या तालुक्यांत ज्वारीच्या पेरणीला गती आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारीची ५७ हजार ६४३ हेक्टरवर पेरा झाला आहे.
जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर असून, ६६ हजार २९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात पेरणीत २३ हजार १८९ हेक्टरने वाढ झाली आहे. तासगाव, पलूस या तालुक्यांत पेरणीला गती आली नाही. तर वाळवा, कडेगाव या तालुक्यांत पेरणीला प्रारंभ झाला आहे. गेल्या आठवड्यापासून गहू, हरभरा या पिकांच्या पेरणीला फारशी गती आली नाही. येत्या आठ ते पंधरा दिवसांत गहू, हरभरा या पिकांच्या पेरणीला गती येईल.
तालुकानिहाय पेरणी
दृष्टिक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
मिरज ३०००
जत ४२,६१४
वाळवा २६७
तासगाव ६९
शिराळा ५८८
आटपाडी ७३२१
कवठेमहांकाळ १०,९६९
पलूस ३०
कडेगाव ३१५
एकूण ६६२९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.