Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : निसर्ग कोपल्यामुळे देशातील रब्बी हंगाम धोक्यात

गहू उत्पादनात घट झाल्यास सरकारी गोदामांत गव्हाचा मोठा साठा करण्याच्या प्रयत्नांत अडथळा येणार आहे.

Team Agrowon

Rain Update News : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे रब्बी हंगाम अडचणीत आला आहे. गहू, हरभरा आणि मोहरी ही प्रमुख पिके ऐन काढणीला आलेली असताना निसर्गाने घात केला.

आधीच उष्णतेच्या लाटेमुळे या पिकांना फटका बसलेला होता. त्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येत्या आठवड्यात मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

त्यामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात मोठी घट होईल आणि त्याचा परिणाम अन्न महागाई वाढण्यात होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक गेल्या अनेक दिवसांपासून महागाईचा दर कमी करण्यासाठी आटापिटा करत आहेत.

सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने घालण्याचा, आयातीला मोकळे रान देण्याचा आणि सरकारी गोदामांतील माल खुल्या बाजारात विक्रीसाठी खुला करण्याचा सपाटा लावला होता.

त्यातच यंदा गहू, हरभरा आणि मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे महागाई कमी करण्यात यश येईल, असा विश्वास सरकारला वाटत होता. परंतु गेल्या काही दिवसांत निसर्गाचा रागरंग बदलल्यामुळे या मनसुब्यावर पाणी पडण्याची चिन्हे आहेत.

गहू उत्पादनात घट झाल्यास सरकारी गोदामांत गव्हाचा मोठा साठा करण्याच्या प्रयत्नांत अडथळा येणार आहे. तर मोहरीचे उत्पादन घटल्यास सरकारला पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढवावी लागणार आहे.

पुढील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात गारपीट होईल तसेच प्रति तास ३० किमी वेगाने वादळी वारे वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रब्बी पिकांना आधीच वाढत्या उष्णतेचा फटका बसला आहे.

पुढील दोन-तीन आठवडे पाऊस आणि वादळी वारे राहिले तर उभे पीक जमिनीवर लोळण घेईल आणि काढणी करणे अवघड होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे केवळ उत्पादनात घट होणार नाही तर पिकांची गुणवत्ताही मार खाईल, असे एका ग्लोबल ट्रेडिंग हाऊसच्या मुंबईतील डिलरने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT