Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season In Crisis : पुरेशा ओलाव्याअभावी विदर्भात रब्बी हंगाम संकटात

Rabi Season : नागपूर विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील ७३४०१.५१ हेक्‍टर वर्धा जिल्ह्याची सरासरी असून १,८०,८२० हेक्‍टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagpur News : सप्टेंबर अखेर पडलेल्या पावसाच्या परिणामी जमिनीत ओलावा आहे. त्याचा हवाला देत कृषी खात्याकडून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी क्षेत्रात वाढ होईल, असे सांगितले जात असले तरी परिस्थिती मात्र याच्या विपरीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संरक्षित स्रोतांचा वापरही पाणी देण्यासाठी करावा लागणार आहे.

नागपूर विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील ७३४०१.५१ हेक्‍टर वर्धा जिल्ह्याची सरासरी असून १,८०,८२० हेक्‍टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे. नागपूरचे सरासरी क्षेत्र १६४९३३.९ असून २२४३९१ हेक्‍टरवर पेरणी होईल.

भंडारा जिल्ह्यात सरासरी लागवड क्षेत्र ७०६३१.१८ हेक्‍टर असून १,१७,६३६ पेरणीचे नियोजन आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरी ६८२५०.३ हेक्‍टरपैकी १२०२८४ पेरणी होईल. चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी ९४१४१.५८ हेक्‍टरच्या तुलनेत १४५२५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४१६७१.८८ हेक्‍टरपैकी ६५१५५ हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन आहे. प्रत्यक्षात मात्र तापमानातील वाढीच्या परिणामी हे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अमरावती विभागात यंदा पावसाची तूट राहिली. त्यामुळे कृषी विभागाकडून ९ लाख ८२ हजार ३७३ हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असले तरी मोठे क्षेत्र पडीक राहण्याची भीती वर्तविली जात आहे.

पावसाचे पाणी एकाचवेळी वाहून गेले. परिणामी ते जमिनीत मुरलेच नसल्याने ओलावा टिकून राहिला नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे. त्यांनाच रब्बी हंगामात पीक घेता येईल, उर्वरित क्षेत्र पडीक ठेवावे लागेल, अशी भीती वागद (महागाव, यवतमाळ) चे शेतकरी मनीष जाधव यांनी व्यक्‍त केली.

जमिनीत ओलावा नसला तरी माझ्याकडे चार विहिरींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध आहे. त्या भरवशावर गहू घेणे शक्‍य होणार आहे.
- राहुल नारळे, बोरी, ता. काटोल, जि. नागपूर
भंडारा हमखास पावसाचा जिल्हा आहे. त्यामुळे आमच्या भागात बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता आहे. त्या भरवशावर मोहरी आणि खपली गहू घेण्याचे नियोजन केले आहे.
- राजेश गायधनी, लाखनी, भंडारा
बोंड परिपक्‍व होण्याच्या अवस्थेत असलेल्या कापूस पिकालाही सध्या पाण्याची गरज आहे. जमिनीतच ओलावा कमी असल्याने सोयाबीन काढणीनंतर वीस एकरांवर घेण्यात येण्याचे प्रस्तावित असलेल्या हरभऱ्याकरिता संरक्षित स्रोतातून पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
- विठ्ठलराव काळे, चांदई, ता. दर्यापूर, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT