Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : रब्बी हंगामाचा पीकविमा लवकरच जमा होणार

Rabi Season : बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. रब्बी २०२३-२४ या हंगामासाठी एक लाख ३५ हजार ५५१ शेतकऱ्यांना २४५ कोटी ४१ लाख रुपये भरपाई मंजूर झाली होती.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी २४५.४१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून आतापर्यंत १२.९३ कोटी रुपये खात्यात वळती झाले आहेत. उर्वरित ११२.२९ कोटी रुपये नुकसान भरपाई पुढील एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे विमा कंपनीने लेखी कळवले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. रब्बी २०२३-२४ या हंगामासाठी एक लाख ३५ हजार ५५१ शेतकऱ्यांना २४५ कोटी ४१ लाख रुपये भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी ९२८२ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपये नुकसान भरपाई वितरित झाली आहे. आता ४७ हजार ७०७ शेतकऱ्यांना ११२.२९ कोटी नुकसान भरपाई मागील आठवड्यातच मंजूर झाली असून रविवारी (ता. २२) ही रक्कम एनसीआयपी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

पुढील एक-दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एकूण प्रीमियम रकमेच्या ११० टक्के नुकसान भरपाई वितरित केली असून, उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जाईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

खरिपासाठी १३८ कोटी वितरण

गेल्या वर्षातील खरीप हंगामासाठी पीकविमा कंपनीने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन लाख ९५ हजार ३१३ शेतकऱ्यांना २५२.१५ कोटी रुपये भरपाई मंजूर केली होती. त्यापैकी २ लाख २४ हजार ४८२ शेतकऱ्यांना १३८ कोटी ५१ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात आले आहेत.

प्रीमियम रकमेच्या ११० टक्के भरपाई कंपनीने वितरित केली असून उर्वरित रक्कम पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे, असे कंपनीने कळवल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

Soybean Farmer Crisis: शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे २ हजारांचे नुकसान, सोयाबीनला ६ हजार भाव कधी मिळणार?; काँग्रेसचा सवाल

Ahilyanagar News: कोरोना काळात चुकीचे उपचार केल्याने मृत्यू, पाच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Agriculture Mulching: शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करुन थांबवा मातीची धूप

SCROLL FOR NEXT