Onion Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Onion Management : पुनर्लागवडपश्‍चात रब्बी कांदा व्यवस्थापन

Rabi Onion : कांदा पिकात प्रामुख्याने मर व करपा रोग आणि फुलकिडे (थ्रीप्स) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

डॉ. पी. ए. साबळे, डॉ. पीयूष वर्मा, एस. के. आचार्य

Onion Crop Management : सूक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खतांची फवारणी - पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता लक्षणांनुसार किंवा जिमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागवडीनंतर ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ (लोह ४ टक्के, जस्त ६ टक्के ,मँगेनीज १ टक्का, तांबे ०.५ टक्का, बोरॉन ०.५ टक्का) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करू शकतो. तसेच कांदा पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ (५ ग्रॅम/लि. पाणी) व ६०-७० दिवसांनी १३:००:४५ किंवा ००:००:५० (५ ग्रॅम/लि. पाणी) फवारणी केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते.

पाणी व्यवस्थापन ः

कांदा पिकास द्यावयाचे सिंचन हे हंगाम, जमिनीचा प्रकार आणि पिकाचे वय यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, कांद्याला लागवडी वेळी, लागवडीनंतर तीन दिवसांनी आणि त्यानंतर जमिनीतील ओलाव्यानुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने सिंचनाची गरज असते. सर्वसाधारणपणे रब्बी पिकाला १२-१५ सिंचनाची गरज असते.

जेव्हा पीक परिपक्व होऊन कांद्याच्या माना पडू लागताच (म्हणजे काढणीच्या १०-१५ दिवस आधी) सिंचन बंद करावे. आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक, तुषार सिंचन) उपलब्ध असल्यास जमिनीपासून १५ सें.मी. उंच १२० सें.मी. रुंद माथा असलेले व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन गरजेनुसार लांबीचे गादीवाफे पाडावेत. रोपांची लागवड करावी. प्रत्येक वाफ्यामध्ये १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरल्सचा वापर करावा. दोन ड्रीपरमध्ये ३० ते ५० सेंमी अंतर ठेवावे. ड्रीपरची उत्सर्जन क्षमता ताशी ४ लिटर असावी.

एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन ः

कांदा पिकात प्रामुख्याने मर व करपा रोग आणि फुलकिडे (थ्रीप्स) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

मर व करपा रोग व्यवस्थापन

एकाच जागेवर वारंवार कांदा पीक करणे टाळावे.

एकरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ०.५ - १ किलो व सुडोमोनास फ्लुरोसन्स १ किलो सेंद्रिय खतात १० दिवस मुरवून देणे.

प्रति किलो बियाणास २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.

रोपांची मुळे कार्बेन्डाझिम* १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.

नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशीत मात्रेत तसेच शिफारशीत वेळेतच करावा.

करपा रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येण्यास सुरुवात होताच मॅन्कोझेब# २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल# २५ ई.सी. १ मिलि प्रति लिटर पाणी फवारणी करावी. गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

मर रोगाच्या नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल + मेंकोझेब* (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी.

टीप : * अग्रेस्को शिफारस. # कांदा व लसूण संशोधन संचालनालयाची शिफारस.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.

फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (डॉ. साबळे हे उद्यानविद्या महाविद्यालय, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, जगूदन, मेहसाणा येथे सहायक प्राध्यापक आहेत.

तर केव्हीके, खेडब्रह्मा, गुजरात येथे डॉ. पीयूष वर्मा हे प्रभारी प्राचार्य आणि अधिष्ठाता असून, एस. के. आचार्य हे सहायक प्राध्यापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT