Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop : पाच जिल्ह्यांत १३ लाख ९ हजार हेक्टरवर रब्बी पिके

Team Agrowon

Latur News : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १३ लाख ९६६४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेतही पेरणी ९६ टक्के असून, हरभरा, करडई, तीळ ही पिके वगळता इतर कोणत्याही रब्बी पिकाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली नाही.

यंदा पेरणी झालेल्या रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, मका, इतर तृणधान्य वगळता इतर पिकांची पेरणी सर्वसाधारण क्षेत्र इतकी झालीच नसल्याची स्थिती आहे. विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर इतके होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख ८७ हजार २९६ हेक्टर म्हणजे ७७.२६ टक्के क्षेत्रावरच रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ९८ हजार १८९ हेक्टरवरच गव्हाची पेरणी झाली. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ९७१ हेक्टर असताना प्रत्यक्षात १५ हजार ९०८ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली. इतर तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३६५७ हेक्टर असताना १२४१ हेक्टर क्षेत्रावरच इतर तृणधान्याची पेरणी झाली.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८० हजार १२४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८ लाख ७२ हजार ८८८ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन १११ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. इतर कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १८९१ हेक्टर असताना प्रत्यक्षात २१९३ हेक्टर क्षेत्रावर इतर कडधान्याची पेरणी झाली.

करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असताना, प्रत्यक्षात २९ हजार ६३० हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन जवळपास दीडपट पेरणी झाली. जवसाचे सर्वसाधारण क्षेत्र १४२७ हेक्टर असताना २२९.४० हेक्टर क्षेत्रावर जवसाची पेरणी झाली. तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र ९५ हेक्टर असताना १४५ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली.

सूर्यफुलाचे सर्वसाधारण क्षेत्र १९११ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ५२५ हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची पेरणी झाली. इतर गळीत धान्याची सर्वसाधारण क्षेत्र २९४८ हेक्टर असताना प्रत्यक्षात १४२७ हेक्टरवरच इतर गळीत धाण्याची पेरणी झाली आहे.

रब्बी ज्वारीवर लष्करी अळी

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेस ७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या रब्बी ज्वारीवर काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सद्यःस्थितीत रब्बी ज्वारीची पीक वाढीच्या अवस्थेत आहे. गहू हरभरा आणि करडईचे पीकही वाढीच्या अवस्थेत असून, हरभऱ्यावर काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हरभऱ्याची पीक काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत तर लवकर पेरणी झालेल्या काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

लातूर २ लाख ८० हजार ४३७ ३ लाख ३१ हजार ६३०

धाराशिव ४ लाख ११ हजार १७२ २ लाख ७३ हजार १२१

नांदेड २ लाख २४ हजार ६३४ २ लाख ८० हजार ४४६

परभणी २ लाख ७० हजार ७९५ २ लाख१८ हजार ६४७

हिंगोली १ लाख ७६ हजार ८९३ २ लाख ५ हजार ८१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT