Rabi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop : पाण्याअभावी रब्बी पीक धोक्यात

येत्या दोन- तीन दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांचे उभे पीक वाळून नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Team Agrowon

Yavatmal News : अडाण नदीपात्रात गेल्या ३० जानेवारीपासून पाणी (Water) सोडण्यात आले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील (Rabi Season) हरभरा (Chana) पीक धोक्यात आले आहे. तत्काळ पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

घाटंजी तालुक्यातील अडाण नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याअभावी कोळी, चिंचोली, किन्ही, निबर्डा येथील रब्बी पीक धोक्यात आले आहे.

येत्या दोन- तीन दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांचे उभे पीक वाळून नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

नदीपात्रात पाणी सोडल्यास सिंचनासह जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय होईल, याकडे दुर्लक्ष केल्यास सहकुटुंब उपोषणाला बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.

या वेळी मनोज राठोड, कैलास चव्हाण, नितीन डफडे, सचिन देशमुख, नेताजी राठोड, मधुकर जुनघरे, महादेव सिडाम, विष्णू बावरू, प्रदीप पवार, राहुल मोहजे, मनोज सल्लार, आकाश राठोड, गणेश देशमुख, खुशाल राठोड, पद्माकर डफडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunetra Pawar Deputy CM: सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदी शपथ, बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Local Body Election: मोहोळ तालुक्यातील ७२ ग्रा.पं.च्या निवडणुकांचे वेध

Livestock Exhibition: घोसरवाड येथे जातिवंत गीर गाय, मुऱ्हा म्हैस प्रदर्शन, स्पर्धा

Wheat Farming: माळशिरस तालुक्यात गव्हाचे पीक जोमात

Cooperative Institutions Crisis: महागाव तालुक्यात सहकारी संस्था अडचणीत

SCROLL FOR NEXT