Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : खरीप लांबल्यामुळे रब्बी अडचणीत

Rabi Sowing : मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामाला विलंबाने सुरुवात झाली.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात खरीप हंगाम लांबल्याचा रब्बी हंगामावर परिणाम होणार आहे. भातपीक कापणी आटोपल्यानंतर रब्बी हंगामाला प्रारंभ होणार असून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या होतील असा अंदाज आहे. मात्र यावर्षी रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता अधिक आहे.

मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामाला विलंबाने सुरुवात झाली. पाण्यावर अवलंबून असलेल्या भात रोपवाटिका वगळता नियमित रोपवाटिकांच्या कामांना २३ जूननंतर सुरुवात झाली.

त्यामुळे १५ ते २० दिवस खरीप हंगामाला सुरुवात झाली. भातरोप पुर्नलागवड देखील ऑगस्टपर्यंत सुरू होती. सध्या पाच ते दहा टक्केच भातपीक परिपक्व झालेली आहेत.

त्यामुळे संपूर्ण भातपीक परिपक्व होऊन कापणी होण्यासाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा उजाडेल असा अंदाज आहे. त्यानंतरच रब्बी हंगामाला सुरुवात होईल.

कोकणात जमिनीतील ओलाव्यावर अधिकतर रब्बीतील पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये कुळीथ, उडीद, मूग, वरणा, तूर अशा पिकांचे उत्पादन घेतले जाते.

परंतु नोव्हेंबरमध्ये जमिनीत ओलावा राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरीच रब्बी हंगामात पेरण्या करतील. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र घटेल असा अंदाज आहे.

पहिल्या टप्प्यातील भातपीक लागवड केलेली आहे. तेथेच वेळेत पेरण्या होणार आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामात पाच हजार हेक्टरवर पेरण्या होतात. परंतु यावर्षी निम्म्यावरच पेरण्या होण्याचा अंदाज आहे. उन्हाळी भुईमूग साधारणपणे सहाशे हेक्टरवर केला जातो तर उन्हाळी भातपीक उत्पादन २ हजार हेक्टरवर केले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: ट्रॅक्टरमधील ऱ्हायनो-हॉर्स गिअर सिस्टिम

Fungal Infection: बुरशीचा प्रकोप टाळण्यासाठी फळे बागेबाहेर टाका

Grazing Land: गायरान धारकांना नुकसानभरपाई द्या

Silk Farming: रेशीम उद्योगात उझी माशीसह रोग नियंत्रणात यश

Soil Erosion: जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना

SCROLL FOR NEXT