Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगलेत ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा

Loksabha Voting Update : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघांसाठी चुरशीने मतदान झाले. कोल्हापूर लोकसभेसाठी सायंकाळी पाचपर्यंत ६३.७१ टक्के तर हातकणंगलेसाठी ६२.१८ टक्के मतदान झाले.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघांसाठी चुरशीने मतदान झाले. कोल्हापूर लोकसभेसाठी सायंकाळी पाचपर्यंत ६३.७१ टक्के तर हातकणंगलेसाठी ६२.१८ टक्के मतदान झाले. उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागामध्ये सकाळी सातपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या. तुलनेने शहरी भागात मतदानाची गती संथ होती. अनेक ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघांमध्ये महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील व स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सर्वच भागामध्ये प्रत्येक उमेदवाराची कमीअधिक ताकद असल्याने विजयाचा अंदाज बांधणे कठीण होत आहे.

सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. प्रशासनाने अनेक गावांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मतदार केंद्राची रचना केली होती. यामध्ये त्या-त्या गावच्या वैशिष्ट्यांची मांडणी केली होती. दुपारी एक ते चारपर्यंत मतदानाची गती उन्हामुळे मंदावली होती. सकाळी ११ पर्यंत सरासरी २० टक्के मतदान दोन्ही लोकसभा मतदार संघात झाले होते. सायंकाळी चारनंतर सहापर्यंत पुन्हा एकदा मतदानास वेग आला. चारनंतर पुन्हा रांगा लागल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT