Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Purchase : हमीभावाने सोयाबीनची खरेदी करा

Soybean Market : शेतकऱ्यांना दिलासा म्हणून निदान ४८९२ रुपयांच्या हमीभावाने ‘नाफेड’मार्फत खरेदी व्हावी, असा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारने मंत्रिमंडळात मंजूर करीत मंगळवारी (ता. १०) केंद्र सरकारकडे पाठविला.

Team Agrowon

Nagpur News : सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर मिळावा यासाठी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा म्हणून निदान ४८९२ रुपयांच्या हमीभावाने ‘नाफेड’मार्फत खरेदी व्हावी, असा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारने मंत्रिमंडळात मंजूर करीत मंगळवारी (ता. १०) केंद्र सरकारकडे पाठविला.

सोयाबीनचा एकरी दहा ते ११ हजार रुपयांचा उत्पादकता खर्च आहे. यावर्षी संततधार पाऊस व इतर कारणांमुळे उत्पादकता प्रभावीत झाली असताना सध्या मिळणाऱ्या बाजार दरातून उत्पादन खर्चाची भरपाईदेखील शक्‍य नाही. त्यामुळेच सोयाबीनला ६००० रुपयांचा दर मिळावा, अशी मागणी आहे. त्यासाठी संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये आंदोलन केल जात आहे. त्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रासह तीन राज्यांत केंद्र सरकारने ९० दिवसांच्या कालावधीकरिता ४८९२ रुपये या हमीभावाने खरेदीला मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर मध्य प्रदेशातही हमीभावाने खरेदी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वातील सरकारने केली. तसा प्रस्ताव मंगळवारी (ता. १०) मंत्रिमंडळ बैठकीत संमत करून तो केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला पाठविण्यात आला. मध्य प्रदेश हे देशातील सर्वांत मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहे.

प्रस्तावाला मान्यता

सोयाबीन लागवड जूनअखेर ते जुलैपर्यंत, सोयाबीन काढणी सप्टेंबरअखेर ते ऑकटोबरमध्ये तर बाजारात सर्वाधिक आवकेचा कालावधी ऑक्‍टोबर ते डिसेंबर असा आहे. त्यानुसार २१ ऑक्टोबर ते १८ जानेवारी या कालावधीत हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावी, असे मध्य प्रदेश सरकारच्य प्रस्तावात नमूद आहे.

दरम्यान मध्य प्रदेश सरकारकडून प्राप्त या प्रस्तावाची तत्काळ दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्याला मान्यता दिल्याचे वृत्त आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मंगळवारी (ता. १०) प्राप्त मध्य प्रदेश सरकारच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. ११) केंद्रीय कृषी मंत्रालयाने मान्यता दिल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT