Fig Agrowon
ॲग्रो विशेष

Fig : पुरंदरच्या अंजिराचं मूळ अफगाणिस्तानात

सासवडपासून पाच किलोमीटरवर किल्ले मल्हारगड आहे. त्याच्या पायथ्याशी सोनोरी नावाचं गाव आहे. हे गाव येतं पुरंदर तालुक्यात. हा पट्टा प्रसिद्ध आहे अंजिरांसाठी.

टीम ॲग्रोवन

सासवडपासून पाच किलोमीटरवर किल्ले मल्हारगड आहे. त्याच्या पायथ्याशी सोनोरी नावाचं गाव आहे. हे गाव येतं पुरंदर तालुक्यात. हा पट्टा प्रसिद्ध आहे अंजिरांसाठी (Fig). पण खरं तर अंजीर हे इथलं मूळ पीक नव्हतंच. ते आणलंय अफगाणिस्तानातून (Afghanistan Is a Native Of Fig). आता ते कसं म्हणाल तर त्यामागे पण एक भारी गोष्ट आहे.

तर पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवडच्या अंजिराला तसं ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवकाळामध्ये या अंजिराचे संदर्भ सापडतात. सासवडपासून पाच किलोमीटरवर सोनोरी नावाचं गाव आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजारांच्या आसपास असेल. गावाच्या दक्षिणेला उंचच उंच अशा डोंगररांगा आहेत. शिवकाळात तिथं किल्ला बांधण्यात आला, त्यावरून गावाला मल्हारगड असं नाव पडलं.

या गावाजवळ असलेल्या पुरंदर किल्ल्याला मिर्झाराजे आणि दिलेरखान यांनी वेढा दिला होता. त्यावेळी त्यांची छावणी सोनोरी गावात पडली होती. त्यांच्या पदरी असलेल्या अफगाण सरदाराला अंजिराचं आयुर्वेदिक महत्व माहित असावं. त्यानं अंजिराची काही रोप अफगाणिस्तानातून आणली होती. सोनोरी गावात अंजीराला पोषक असं उष्ण आणि कोरड हवामान होतं. त्यामुळे त्यानं ही रोपं काही शेतकरी कुटुंबांना दिली. अशा रीतीने सोनोरी गावात पहिल्यांदा अंजिरांची लागवड झाली.

ही अंजीर युरोपात गेली ती इंग्रजांमुळे. इंग्रजांच्या काळात व्यापारासाठी सोनोरी गावाजवळ राजेवाडी इथं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. तिथं वेगवेगळ्या प्रकारचा शेतमाल इंग्रज त्यांच्या देशात पाठवायचे. त्याचाच एक भाग म्हणून अंजीर पण परदेशात गेला असावा. जसजसं अंजीर या रेल्वेने देशाच्या इतर भागात जाऊ लागलं तसतसं सोनोरीच्या अंजिराची ख्याती सर्वदूर पसरली. या अंजीरातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गावातल्या बऱ्याच कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू झाला.

हळूहळू अंजिर शेतीचं क्षेत्र वाढत गेलं. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि जवळपासचा परिसर अंजीरचा पट्टा म्हणून नावारूपाला आला. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून गावातल्या शेतकऱ्यांनी अंजीर पिकाकडे एक व्यावसायिक पीक म्हणून बघायला सुरुवात केली. यथावकाश पुना फीग अशी या अंजिराची ओळख निर्माण झाली. या अंजिरानं बहात्तरच्या दुष्काळात गावकऱ्यांना मोठा आधार दिला होता.

मागील काही वर्षांपासून गावात बागा वाढत आहेत. याचं कारण म्हणजे गावातील सुशिक्षित तरुण अंजीर बागांकडे वळत आहेत. वर्षातून दोन वेळा ते बहर घेतात. प्रामुख्यानं ‘खट्टा बहार’ हिवाळ्यात तर ‘मीठा बहार’ उन्हाळ्यात घेतला जातो. हे पीक नगदी असल्याने वर्षभर याला बाजारात मागणी असते आणि त्यानुसार छाटणीचं नियोजन केलं जातं. महाराष्ट्रातील अंजीर लागवडीपैकी साधारण ६०० हेक्टरच्या आसपास क्षेत्र हे एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. तर पुरंदर तालुक्यात सुमारे ४५० हेक्‍टर क्षेत्र आहे.

या अंजिराची खासियत ओळखून २०२०-२१ मध्ये पुरंदर अंजीर या पिकाला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय टॅग सुद्धा मिळाला आहे. अशा या अंजिरामुळे सोनोरी गावाला जगभरात ओळख मिळाली आहे. गावात एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर फिरायचे. आता मात्र बंधारे, शेततळ्यांनी समृद्ध सोनोरी अंजीर आणि इतर फळबागांनी बहरले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

Girna Dam Water Storage : गिरणा धरणातील जलसाठा वाढतोय

Pandharpur Flood : पंढरपुरातील पुराचा धोका टळला

Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्याचा मुलगा ते कृषिमंत्री; दत्तात्रय भरणे यांचा प्रवास

Agrowon Podcast: गव्हाचे दर टिकून; हळदीत चढउतार, केळीला श्रावणाचा उठाव, आले दरात सुधारणा, मका स्थिरावलेला

SCROLL FOR NEXT