Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : पुरंदर, बारामतीत भीषण चाराटंचाई

Fodder Defict : टँकरच्या संख्येत झपाट्याने होतेय वाढ

Team Agrowon

संदीप नवले
Water Defect : पुणे : उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने त्याचे परिणाम जाणवू लागले आहे. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तालुक्यांतील अनेक भागांत चाऱ्याची टंचाई भेडसावू लागली
आहे. तर उर्वरित तालुक्यात काही प्रमाणात चारा उपलब्ध असला तरी हळूहळू तेथेही चारा टंचाईची जाणवू लागली आहे. तर, पुरंदरमध्ये काही ठिकाणी अवघा एक ते दीड महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. या भागातून मे, जूनमध्ये चारा छावण्यांची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला चांगलाच आधार मिळाला आहे. पश्चिमेकडील तीन तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात हंगामात सरासरीच्या ८६१.६ मिलिमीटरपैकी ६५६.९ मिलिमीटर म्हणजेच ७६.२ टक्के पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. परंतु इंदापूर, बारामती, शिरूर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. त्यामुळे भूजल पातळीत चांगलीच घट झाली असून पुरंदरमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ आली होती. मागील दोन महिन्यांपासून अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्याने फळबागासह, उन्हाळी हंगाम अडचणीत आला आहे.

टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ
गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचे परिणाम चांगलेच जाणवू लागले आहे. पुरंदर, बारामती आणि इंदापूरमध्ये पाण्याची टंचाई अधिक आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील ११७ गावे व ७६२ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे दोन लाख २३ हजार १५ नागरिकांना १४८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी ६० विहिरी व चार बोअरवेल अधिग्रहण केल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून पाण्याची मागणी येईल, तेथे तातडीने टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याची अडचण येणार नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात अवघा तीन लाख टन चारा
पाणीटंचाईमुळे हिरव्या चाऱ्याची अनेक ठिकाणी टंचाई भासत आहे. त्यातच साखर कारखाने बंद झाल्याने उसाचे वाडे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे. जिल्ह्यात एकूण ११ लाख ४४ हजार ८९३ जनावरे आहेत. यात लहान सुमारे ३ लाख ४३ हजार ४६८, तर मोठी ८ लाख १ हजार ४२५ एवढी आहेत. त्यासाठी दररोज सुमारे पाच हजार ८३९ टन हिरवा चारा आवश्यक आहे. तर महिन्याला एक लाख ७५ हजार १६९ टन सुकाचारा आवश्यक असतो. परंतु सध्या हा चारा मिळणे अवघड झाले असून अंदाजे दोन लाख ९२ हजार ६४५ टन एवढाच चारा उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली आहे. हा चारा पुढील एक ते दोन महिने पुरेल एवढाच आहे. त्यानंतर पाऊस झाल्यास चारा उपलब्ध होईल, न झाल्यास चाऱ्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे.

जनावरे बाजारावर मंदीचे संकट
दूध दरवाढीची शक्यता मागील महिन्यात मावळल्यानंतर दुधाच्या दरामध्ये दीड ते दोन रुपयांनी कपात झाली होती. यानंतर आता जनावरे बाजारामध्ये देखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. संकरित गायींच्या किमती तब्बल ३० ते ४० हजारांनी खाली उतरल्या असून त्या ८० ते एक लाख रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर जनावरे बाजारात शेतकरी ग्राहकांऐवजी व्यापारीच दिसून येत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा केली होती. त्याचे परिणाम जनावरे बाजारावर दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये दूध दरात दीड ते दोन रुपयांची कपात झाली. दरामध्ये कपात होण्यापूर्वी दुधाला २६ ते २७ रुपये दर मिळत होता. आता हा दर २४ ते २५ रुपयांवर आला आहे.


पुरंदर, बारामती भागांत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासू लागली आहे. या भागांत उपसा सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन
सुरू असून आवर्तनाचे ही नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पुरंदरमधील चार मंडलांत चाराटंचाई भासत आहे. तेथे चारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या चारा छावण्यांची मागणी नाही. परंतु गरज वाटल्यास तसे नियोजन करण्यात येईल.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT