Water Awareness Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation: पुणेकरांनी घेतली जलसाक्षरतेची शपथ

Pune Water Management: पुणेकरांनी जलसाक्षरतेची शपथ घेत जलसंवर्धनाचा जागर केला. ‘पाण्यासाठी एक साद’ या गीतमैफिलीतून पाणी वाचविण्याचा संदेश देत संगीतातून जलसाक्षरता रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Team Agrowon

Pune News: ‘जलसाक्षरता केवळ एका चळवळीपुरती मर्यादित राहता कामा नये. त्यासाठी पाण्याचे प्रदूषण रोखावे. पाण्याचा योग्य सन्मान करावा. अशा विचारमंथनासह ‘पाणी आहे, तर भविष्य आहे’ असे सूत्र साधत पुणेकरांनी जलसाक्षरतेची शपथ घेतली.

‘दिशा २०२५’ आणि ‘अंतर्नाद कला साधना’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाण्यासाठी एक साद’ या गीतमैफिलीतून पाणी वाचविण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. या उपक्रमाच्या अंतर्गत पाणी वाचविण्याचा संदेश देण्यासाठी अंतर्नाद कला साधना संस्थेच्या सहकार्याने संगीताचा प्रभावी वापर करण्यात आला.

या गीतमैफिलीत डॉ. गौरी बापट, अनुजा गाडे, प्रिया अय्यर आणि अनघा पाठक यांनी ‘घन बरसून आला’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं’, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ ‘जलाशयाच्या लक्ष दर्पणी, ‘पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे’, ‘तोहरे ताल मिले नदी के जलमे’, ‘नभ उतरू आलं’ यांसारखी पाणी आणि निसर्गावर आधारित गाणी सादर केली. त्यास रसिकांना उत्स्फूर्त दाद दिली.

या वेळी जलव्यवस्थापनतज्ज्ञ सतीश खाडे यांनी पाणीटंचाई, जलप्रदूषण आणि त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘मानवी आरोग्याच्या समस्या वाढविणाऱ्या आजारांपैकी ७० टक्के आजार असुरक्षित पाण्यामुळे होतात. पाणी मिळवण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरे फुगत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे.’’

नागरिकांनी पाण्याच्या सुयोग्य वापरासंबंधीची प्रतिज्ञा घेऊन या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. नीता उपासनी यांनी सूत्रसंचालन केले.

पुण्यातील वाढत्या काँक्रिटीकरणामुळे भूजल पातळी घटत आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी पुनर्भरण आणि जलसंधारण गरजेचे आहे. पाण्याचा सुयोग्य वापर, पुनर्वापर आणि प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
सतीश खाडे,जलव्यवस्थापनतज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT