Swabhimani Shetkari Sanghatana Agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Shetkari Sanghatana : सहकारमंत्र्यांच्या विरोधात 'स्वाभिमानी' आक्रमक : पुणे- नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या

Farmer Protest : सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसाला ३४०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी मंचर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे - नाशिक महामार्गावर ठिय्या मांडला.

Swapnil Shinde

Manchar News : सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव परिसरातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाला प्रतिटन ३४०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यांनी आज मंचर येथे पुणे - नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसाला ३४०० रुपये दर द्यावा, या मागणी गेल्या ६ दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आंदोलन सुरू केले आहे. परंतु, प्रशासनाकडे त्याची दखल घेतली जात नसल्याचे निषेधार्थ आज स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी नेतृत्वाखाली मंचर येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे अर्धातास महामार्गावरील वाहतूक रोखली होती. यावेळी स्वाभिमानीच्या वतीने सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला एफआरपीपेक्षा जास्त दर जाहीर करत ३ हजार ४११ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. भीमाशंकर कारखान्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ऊसाला ३४०० रुपये प्रतिटन दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Return Monsoon Forecast: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

Food Grain Production: रब्बीमध्ये १७७७ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT