Pune Vegetable Market Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Weekly Market: पुणे शहरात ४ ठिकाणी सुरू होणार आठवडी बाजार

Organic Produce Farmer Markets: पुणे शहरात जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या सहकार्याने चार ठिकाणी आठवडी बाजार सुरू होणार आहेत, ज्यामुळे पुणेकरांना शेतकऱ्यांपासून थेट ताज्या सेंद्रिय भाजीपाला आणि फळांचा लाभ होईल.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात चार ठिकाणी आठवडी बाजार सुरू केले जाणार आहेत.

महापालिकेच्या हद्दीतील अॅमेनिटी स्पेस लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन-बालेवाडी या ठिकाणची जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांत हे सर्व बाजार सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

शासनाच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत जागतिक बँकेच्या मदतीतून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत हे आठवडे बाजार उभारले जाणार आहेत.

शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जामध्ये सुधारणा करून, शहरी भागातील ग्राहकांना रसायन अवशेष मुक्त आणि ताजी फळे व भाजीपाला वाजवी दारात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा, तसेच वाहतूक कोंडी कमी व्हावी हा उद्देश आहे. शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणातर्फे (आत्मा) निवड केलेल्या समुदाय आधारित संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांना या बाजारात विक्रीसाठी संधी देण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांचा अन्न पोषणाचा स्तर उंचावणे, शाश्वत अन्न व्यवस्था शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल व उत्पादने थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था निर्माण करणे. तसेच शहरी भागातील नागरिकांना स्वच्छ, ताजे, गुणवत्तापूर्ण पोषणयुक्त फळे, भाजीपाला, मांस उपलब्ध करून देण्यासाठी हे बाजार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
पृथ्वीराव बी. पी.अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT