Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समिती बरखास्‍तीच्या मार्गावर?

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमधील अनागोंदी कारभारावर आता पणन संचालनालयाने देखील हात टेकले आहेत. गेल्या दीड वर्षातील संचालक मंडळाच्या अयोग्य कारभारामुळे त्रस्त झालेले बाजार घटक आता बाजार समितीची बरखास्तीची वाट बघत आहेत.

तर सभापतींवर अविश्‍वास ठराव मंजूर करण्यासाठी दहा संचालकांनी खास सभा आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे अविश्‍वास ठरावाच्या सभेची तारीख कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या २१ वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुणे बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर बाजार समितीवर सलग २१ वर्षे प्रशासक आणि प्रशासकीय मंडळाची सत्ता होती. मात्र गेल्या दीड वर्षापूर्वी निवडणूक होऊन संचालक मंडळ नियुक्त झाले.

यामध्ये २१ वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराचा ठपका असलेलेच संचालक पुन्हा निवडून आले. यानंतर गेल्या दीड वर्षात बाजार समिती विविध गैरकारभारांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत राहिली. यानंतर दोन चौकशी समित्या स्थापन केल्या, मात्र या चौकशांचे अहवाल अद्याप गुलदस्तात आहे.

दरम्यान, सभापती दिलीप काळभोर यांचे सह्यांचे अधिकार काढून घेण्याचा ठराव, झाल्यानंतर सह्यांचे अधिकार कोणाला द्यायचा, हा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा उपस्थित झाला आहे. या मुद्द्याला सभापती काळभोर यांनी पणन संचालक आणि विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपिल केले. यामुळे सह्यांच्या अधिकाराचे प्रकरण सुनावणीत अडकले आहे. आणि बाजार समितीचे काम ठप्प झाले.

यामुळे आता सभापतींवरच अविश्‍वास ठराव आणण्यासाठी सभापतींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. अशा मनमानी कारभारामुळे बाजार समितीचे नुकसान होत असल्याचा आरोप करत अविश्‍वास ठरावासाठी दहा संचालकांनी खास सभा आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव बहुमताने संमत झाला. संचालक प्रशांत काळभोर यांच्याकडे सह्यांचे अधिकार सोपवले आहेत. त्यानंतर ठरावाच्या अंमलबजावणीस अडचणी येत असून याबाबत मार्गदर्शन करावे, असे पत्र बाजार समितीच्या प्रभारी सचिवांनी पणन संचालकांना दिले आहेत.

तसेच सभापती दिलीप काळभोर यांनी विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे यांच्याकडे ठरावाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी सुरू असून, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे या सर्व घडामोडीनंतर बाजार समितीत सह्या नक्की कोणी करायच्या, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दोन्ही गटांकडून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांनी नेमके ऐकायचे कोणाचे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

या संचालकांकडून अविश्‍वास ठरावासाठी अर्ज

उपसभापती सारिका हरगुडे, मनीषा हरपळे, नितीन दांगट, प्रशांत काळभोर, दत्तात्रेय पायगुडे, शशिकांत गायकवाड, लक्ष्मण केसकर, संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले, प्रकाश जगताप या दहा संचालकांनी अविश्‍वास ठरावासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT