Pune Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Forest Development: पुणे वनविभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वनविभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

Team Agrowon

Pune News: पुणे ‘‘जिल्ह्यात वनक्षेत्रात अनेक पर्यटनस्थळे असून त्यांचा विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यादृष्टीने पुणे वनविभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वनविभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

वनपर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते मंगळवारी (ता. २९) बोलत होते. या वेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते.

राजगड पायथा येथे वनविभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्या निर्माण करताना वनविभागाचे नियम, मानके लक्षात घ्याव्यात. स्थानिक दगड, माती, लाकूड आदींचा वापर करून पर्यावरणपूरक विकास करावयाचा आहे. सिमेंट काँक्रीट किंवा अन्य बाबींचा वापर करण्यात येणार नाही.

पर्यटक अधिकाधिक भेटी देतात अशी ठिकाणे निश्‍चित करून त्या ठिकाणी दगडी बाकडे, शौचालये, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करून लहान रस्ते, लाकडी बॅरिकेडिंग, रेलिंग आदी करावे. संबंधित ठिकाणांची महत्त्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस तयार करावेत, अशाही सूचना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT