Sahiwal Cow Agrowon
ॲग्रो विशेष

Sahiwal Cow : पुणे कृषी महाविद्यालयास साहिवाल गोवंश संवर्धन प्रकल्प मंजूर

Indigenous Cow : मेरठ (उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागास साहिवाल गोवंश संवर्धन आणि संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे.

Team Agrowon

Pune News : मेरठ (उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागास साहिवाल गोवंश संवर्धन आणि संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे. देशातील हे चौथे माहिती संकलन केंद्र असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.

दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गोवंशाच्या आनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, संशोधन आणि प्रसार हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पामुळे जातिवंत साहिवाल गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस मदत होणार आहे. केंद्रीय गाय संशोधन संस्थेमध्ये देशी गोवंशावर संशोधन केले जाते. दुधासाठी प्रसिद्ध साहिवाल, गीर आणि कांकरेज गोवंशाची जातिवंत पैदास, दूध उत्पादनवाढीवर विशेष संशोधन प्रकल्प राबविला जातो.

प्रकल्पाच्या तांत्रिक कार्यक्रमामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था तसेच देशातील विविध कृषी विद्यापीठांचा समावेश आहे. सध्या देशामध्ये तीन प्रमुख माहिती संकलन केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये पशुपालक तसेच सरकारी प्रक्षेत्रावरील जातिवंत दुधाळ देशी गोवंशाची नोंदणी घेतली जाते. जातिवंत पैदाशीच्या माध्यमातून आनुवंशिक सुधारणा केली जाते.

संशोधन केंद्रातील उच्च वंशावळीच्या गाईंपासून जन्मलेल्या वळूचा गुणवत्ता चाचणी कार्यक्रमांमध्ये समावेश केला जातो. संशोधन आणि तंत्रज्ञान विस्ताराची गरज लक्षात घेऊन देशातील चौथे माहिती संकलन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठास मंजूर झाले आहे.

विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने, डॉ. विष्णू नरवडे आणि डॉ. धीरज कंखरे यांच्याकडे या नवीन प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार आणि अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी नवीन प्रकल्पाबाबत शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

साहिवाल गोवंशाची वैशिष्ट्ये ः

१) पंजाब प्रांतातील गोवंश. अत्यंत शांत स्वभाव. देशातील सर्वोत्कृष्ट दुधाळ गोवंश.

२) हवामान बदलाच्या काळातही दूध उत्पादनामध्ये सातत्य. चांगली रोगप्रतिकारक शक्ती.

३) सरासरी दूध उत्पादन क्षमता २,५०० ते २,७५० लिटर प्रति वेत.

४) दुधातील स्निग्धांश ४.५ ते ४.७५ टक्के.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने २०१५ मध्ये ‘साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्रा’ची स्थापना केली. प्रयोगशील पशुपालक, कृषी पदवीधरांना एकत्र करून अठरा साहिवाल गाईंपासून हा प्रकल्प सुरू झाला. सध्या यातील सदस्यांतर्फे सुमारे पाच हजारांहून अधिक साहिवाल गोवंशाचे संगोपन केले जाते. पशुपालकांच्या सहभागातून देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी उभी राहिलेली ही देशातील एकमेव चळवळ आहे. महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांकडे साहिवाल गोवंश आहे, त्यांच्यामध्ये आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे.
- डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT