Chana Rate
Chana Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Market : हरभरा खरेदीसाठी जाहीर उत्पादकता अडचणीची ठरणार

Team Agrowon

Jalna Chana News : एकीकडे आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचा दोन दिवस घोळ सुरू असतानाच कृषी विभागाच्या (Agricultural Department) द्वितीय अंदाजानुसार रब्बी हंगाम २०२२-२३ साठी हरभरा खरेदी करीता हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली.

प्रत्यक्ष येणारे उत्पादन व जाहीर उत्पादकतेचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना आपला हरभरा आधारभूत किमतीपेक्षा बाजारात मिळणाऱ्या कमी दरानेच विकण्याची वेळ येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी २७ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात २७ व २८ फेब्रुवारीला औरंगाबाद, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यांतील बहुतांश केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती.

माहितीनुसार ‘नाफेड’ने एनईएमएल पोर्टलला माहिती दिल्यानंतर जिल्हानिहाय केंद्राला ऑनलाइन नोंदणी करता पोर्टल ओपन केले जाते. ते ओपन न झाल्याने पहिल्या दोन दिवसांत अनेक केंद्र ऑनलाइन नोंदणी करू शकले नाही.

बुधवारीही प्रस्तावित केंद्रांपैकी ऑनलाइन नोंदणीसाठीचे केंद्र अधिकृत करणे सुरूच होते. जालन्यातून २९, उस्मानाबाद व लातूरमधून प्रत्येकी २२ प्रस्ताव खरेदी केंद्रासाठी आले होते.

त्यापैकी धाराशिव व जालनामधून प्रत्येकी सहा व लातूर व छत्रपती संभाजीनगरमधून ८, केंद्र ऑनलाइन सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगळवारी अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी करून ऑफलाइन नोंद केली.अर्थात, जोवर पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी होत नाही, तोवर ऑफलाइन घेतलेल्या नोंदीला अर्थ उरत नाही ही वस्तुस्थिती आहे.

कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी रब्बी हंगाम २०२२-२३ करिता आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

ही उत्पादकता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा उत्पादित हरभरा कमीत कमी कसा खरेदी केला जाईल याच पद्धतीची असल्याचे सूर आता शेतकरी वर्गातून उमटत आहे.

एकरी उत्पादन जास्त असताना खरेदीसाठीच्या उत्पादकता मर्यादेत उत्पादित हरभरा विकला जाईल, कसा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडतो आहे.

त्यामुळे हरभरा खरेदीसाठीची तारीख जाहीर झाली, त्यापूर्वी आधारभूत किमतीने खरेदीसाठी वाढीव उत्पादकता जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होते आहे.

पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणेच उत्पादकतेचा खोडा घातला आहे. शेतकऱ्यांना आपला उत्पादित हरभरा विकण्यात अडचणी येणार हे स्पष्ट आहे. आमच्याकडे एकरी उत्पादकता जास्त असताना जाहीर उत्पादकतेनुसार खरेदी झाल्यास पूर्ण हरभरा आधारभूत किमतीने विकणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही.
भगवानराव डोंगरे, सावरगाव, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT