शेतकरी नियोजन । पीक ः टोमॅटोशेतकरी ः प्रभाकर भगवानराव चव्हाळगाव ः मोरेगाव, ता. सेलू, जि. परभणीएकूण क्षेत्र ः ४० एकरटोमॅटो लागवड ः ४ एकर.परभणी जिल्ह्यातील मोरेगाव (ता. सेलू) येथील तरुण शेतकरी प्रभाकर भगवानराव चव्हाळ हे तंत्रशुद्ध पद्धतीने बारमाही विविध भाजीपाल्यांचे उत्पादन घेतात. उन्हाळी, पावसाळी, हिवाळी या तीनही हंगामांत टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयातील प्रभाकर यांनी २०१२ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करत त्यांनी विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली..Tomato Farming: टोमॅटो उत्पादनातून मिळाले आर्थिक स्थैर्य .फळे, फुले, भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी कुटुंब म्हणून चव्हाळ परिवाराची ख्याती आहे. त्यांची ४० एकर शेतजमीन आहे. हळद, आले, मिरची या मसालावर्गीय पिकांसह टोमॅटो, ढोबळी मिरची, फ्लॉवर, पपई, बिगर हंगामी टरबूज, उन्हाळी हंगामात काकडी, खरबूज आदी पिकांचे उत्पादन ते घेतात. फळे-भाजीपाला पिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यावर चव्हाळ कुटुंबाचा विशेष भर असतो. शेतीत कीड, रोग आणि सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन केले जाते. बाजारपेठेतील आवक आणि दरांचा अंदाज घेऊन लागवडीवर भर दिल्यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे..टोमॅटो उत्पादनातील ठळक बाबीतीनही हंगामांत टोमॅटोचे लागवडीवर भर.बाजारातील टोमॅटो रोपांची विक्री तसेच उत्पादनाचा अंदाज घेऊन लागवड क्षेत्र निश्चित करून रोपवाटिकेतून रोपांची खरेदी.लागवडीसाठी रोपांची आगाऊ मागणी नोंदवितात.उन्हाळी हंगामातील लागवड मार्च महिन्यात, तर पावसाळ्यात जूनमध्ये त्यानंतर ऑगस्ट टोमॅटो लागवड.तीनही हंगामांत मल्चिंगवर टोमॅटो लागवडीवर भर.दोन ओळींत ५ फूट, तर दोन झाडांत ४० सेंमी अंतर राखून लागवड.लागवडीसाठी एकरी ७ हजार रोपांचा वापर.लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी बुरशीनाशके, ह्युमिक ॲसिड, १९ः१९ः१९ या घटकांचा आळवणीद्वारे वापर..Tomato Farming: टोमॅटो लागवडीत पीक संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर.वाण निवडीला प्राधान्यहंगामनिहाय टोमॅटो लागवडीसाठी वाणाची निवड केली जाते. लागवडीसाठी वाण निवड करताना तापमानास प्रतिकारक्षम, कीड-रोगांस प्रतिकारक, गुणवत्तापूर्ण रंग, आकार आणि उत्पादन असलेल्या वाणांच्या निवडीवर भर दिला जातो. उन्हाळी लागवडीसाठी उच्च तापमानास प्रतिकारक्षम वाणांची निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. लागवडीसाठी अधिक पाने असलेल्या वाणांची लागवड केली जाते. त्यामुळे फळांचे उन्हापासून संरक्षण होते. जून आणि ऑगस्ट एकाच वाणाची लागवड केली जाते..टोमॅटोचा आकार आणि दर्जा राखण्यावर भरटोमॅटो फळांचा आकार, चकाकी आणि दर्जा राखण्यासाठी कॅल्शिअम, बोरॉन यासह १३ः०ः४५, पोटॅशिअम शोनायट या विद्राव्य खतांचा ठिबकद्वारे वापर केला जाते. टोमॅटो लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी बांबू आणि तारांच्या साह्याने झाडांची बांधणी केली जाते. त्यामुळे वेलीच्या वाढीस वाव मिळून फळधारणा चांगली होण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ मिळते. शिवाय फळांची नासाडी होत नाही. टोमॅटो लागवडीमध्ये ठिबकद्वारे सिंचन केले जाते. फळधारणा अवस्थेत पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाते. पिकास पाण्याचा ताण पडू दिला जात नाही. उन्हाळी हंगामात तापमान आणि जमिनीच्या मगदुरानुसार सिंचनाचा कालावधी वाढविला जातो..Tomato Farming : मल्चिंग, नेटमुळे टोमॅटो गुणवत्तेत वाढ.पीक संरक्षणलागवडीनंतर पहिल्या महिन्यात टोमॅटो पिकावर नागअळी किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते.फुलोरा अवस्थेत फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पिकाचे नियमित निरीक्षण केले जाते. प्रादुर्भाव आढळल्यास, त्वरित रासायनिक कीडनाशकांची फवारणी केली जाते.पावसाळ्यात ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा आलटून-पालटून वापर केला जातो..टोमॅटो पिकामध्ये ट्युटा अळीचा प्रादुर्भाव झाल्यास फळांचे मोठे नुकसान होते. फळांचा दर्जा खालावल्यामुळे अशा फळांना बाजारात चांगले दर मिळत नाहीत. त्यामुळे या अळीच्या प्रादुर्भाव त्वरित आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेणेकरून संभाव्य नुकसान टाळले जाईल. व्यवस्थापनासाठी एकरी ८ ते १० कामगंध सापळे लावले जातात.उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवडीत प्रामुख्याने विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पीक निरीक्षण करून नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते..Tomato Bitter Gourd Farming : टोमॅटो-कारले पीक पद्धतीचे अवगत केले तंत्र .विक्री व्यवस्थापन...टोमॅटो लागवडीनंतर वाणांनुसार लागवडीनंतर साधारणपणे ६० ते ७५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. उत्पादित टोमॅटो काढणी योग्य अवस्थेत करण्यास प्राधान्य दिले जाते. काढणी सकाळी किंवा संध्याकाळी केली जाते. जेणेकरून टोमॅटोची गुणवत्ता टिकून राहील. काढणीनंतर टोमॅटो फळांचा आकार, रंग व गुणवत्ता यानुसार लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात वर्गीकरण केले जाते. जेणेकरून बाजारात एकसारख्या आकाराची टोमॅटो जाऊन चांगले दर मिळतील. काढणीनंतर टोमॅटो प्लॅस्टिक क्रेटमध्ये भरले जातात..काढणी केलेले टोमॅटो सेलू, परभणी, मंठा, जालना, नांदेड, पाथरी, जिंतूर आदी ठिकाणच्या बाजारात जाऊन स्वतः विक्री करतात. सध्या ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या १.५ एकरावरील टोमॅटोचे उत्पादन सुरू आहे. आतापर्यंत २२ किलो वजनाचे १५०० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळाले आहे. पुढील काळात आणखी ७०० क्रेट उत्पादन मिळेल. उन्हाळी हंगामात उत्पादन कमी मिळते. मात्र बाजारात या काळात चांगले दर मिळतात. त्याचा फायदा होत आहे, असे प्रभाकर सांगतात..सध्याचे नियोजनमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ एकरावर टोमॅटो लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार रोपांची मागणी नोंदवून उपलब्धता करण्यात आली. दरम्यानच्या काळात मशागत करून जमीन तयार करून घेतली. रोप लागवडीपूर्वी मल्चिंग तसेच ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या.लागवड नियोजनानुसार रोपांची उपलब्धता करून दोन ओळींत ५ फूट, तर दोन झाडांत ४० सेंमी अंतर राखून लागवड केली. लागवडीसाठी एकरी ७ हजार रोपांचा वापर करण्यात आला..लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी बुरशीनाशके, ह्युमिक ॲसिड आणि १९ः१९ः१९ या घटकांचा आळवणीद्वारे वापर केला.आगामी काळात उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल. नियमितपणे पिकाचे निरिक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्या घेतल्या जातील.- प्रभाकर चव्हाळ ८४८३८८३३३३(शब्दांकन ः माणिक रासवे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.