Caution Board Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : नीलगाय संचार क्षेत्रात रस्त्यांवर जनजागृती

Wild Animal : राखीव वनांच्या संगोपनामुळे निलगाईंची संख्या वाढली आहे. चारा, पाण्याच्या शोधात नीलगाई कधी कधी वाहतुकीच्या मार्गावर येतात. त्यामुळे अनेकदा वाहनांना धडकून निलगाईंचे अपघात झाले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : राखीव वनांच्या संगोपनामुळे निलगाईंची संख्या वाढली आहे. चारा, पाण्याच्या शोधात नीलगाई कधी कधी वाहतुकीच्या मार्गावर येतात. त्यामुळे अनेकदा वाहनांना धडकून निलगाईंचे अपघात झाले आहेत.

यात बऱ्याचदा जखमी झालेल्या निलगाई दगावल्या आहेत. तर वाहन चालक जखमी झाले असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सावधानता म्हणून वनविभागाने निलगाई संचार क्षेत्रात सावधानता फलक लावले आहेत.

अस्नोली, शेणवे, ऊंभ्रई, कानवे, खरीड, मानेखिंड, टाकीपठार, सावरोली याठिकाणी राखीव वनक्षेत्रात दाट जंगल वाढले आहे. त्यामुळे निलगाईंची संख्याही वाढली आहे. वनक्षेत्रात नीलगाईंचा संचार वाढल्याने फलक लावले आहेत.

निलगाईंचा संचार असलेल्या क्षेत्रातील रस्त्यावर सूचना फलक लावल्याने चालकांनी दक्षता घेतल्याचे दिसते. अनेक दिवसांपासून कोणतीच तक्रार आलेली नाही. त्यामुळे नीलगाईंच्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.
कमलाकर मोरघे, वनपाल, किन्हवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT