Poultry Farming: पोल्ट्री उद्योगात पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन पेंडच्या दरातील चढ-उतार आणि साठेबाजीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जीएम सोयाबीन पेंड आयातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया’ने केली आहे..‘पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष रणपाल दांडा यांनी सांगितले, की देशभरात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योगाचा वेगाने विस्तार होत असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. मात्र पशुखाद्य घटकांच्या दरात व्यापाऱ्यांकडून अचानक वाढ केली जाते. विशेषतः सोया पेंडची साठेबाजी करून.Soybean Market: सोयाबीनचे ३२८ कोटी ६२ लाख रुपयांचे चुकारे अदा .दर कृत्रिमरीत्या वाढवले जात असल्याने उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, पशुखाद्यातील दुसरा महत्त्वाचा घटक असलेल्या मक्याची उपलब्धता सध्या चांगली असल्याने दर काहीसे दबावात आहेत. तरीही हंगामात संकरित बियाण्यांची मागणी वाढली, की काही कंपन्यांकडून काळाबाजार होऊन दर वाढवले जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे बियाणे क्षेत्रातील अशा अपप्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच मका लागवड वाढीसाठी शासनाने अनुदानित बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली..दांडा यांनी स्वतःच्या अनुभवाचा दाखला देत सांगितले, की त्यांनी १५ एकरांत मका लागवड केली असून, बिहारमधील काही शेतकरी प्रति एकर चार टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत. योग्य धोरण आणि उपलब्धता असल्यास मका उत्पादनात वाढ होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. सोयाबीन पेंड दरातील अस्थिरता आणि बियाणे बाजारातील अनियमितता यामुळे पोल्ट्री उद्योग सध्या दबावाखाली असून, शासनाच्या धोरणात्मक हस्तक्षेपाची गरज अधिक तीव्र झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले..Soybean Rate : सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ९४५ रुपये दर देण्याची मागणी.धोरणनिश्चिती अपेक्षितयापूर्वी बांगलादेशमधून जीएम सोया पेंड आयातीला परवानगी देण्यात आली होती. त्या वेळी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उद्योगाची गरज लक्षात घेता एक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ‘पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया’ने व्यक्त केली आहे..भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातून सोया पेंडची निर्यात झाल्यास या दरात तेजी येऊ शकते, असे वारंवार सांगितले जात होते. मात्र आता पोल्ट्री उद्योजकांनी सोया पेंड आयातीची मागणी केली आहे. ती पण जीएम सोया पेंडची. यामुळे भारतीय शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.- रोहन राऊत, शेतकरी, वडकी, ता. भिवापूर, नागपूर.जीएम सोया पेंड आयात केल्यास देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शासनाने सोया पेंडसाठी एक निश्चित दर ठरवावा. तो दर ओलांडल्यासच जीएम सोया पेंड आयातीला परवानगी द्यावी, अशी आमची भूमिका आहे.- रणपाल दांडा, अध्यक्ष, पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.