Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Mission India: ‘मिशन फॉर कॉटन’करिता २५०० कोटी रुपयांची तरतूद; कापसाला नवा बूस्ट!

Government Cotton Scheme: केंद्र सरकारने भारतीय कापूस उत्पादकांसाठी मोठा निर्णय घेत ‘मिशन फॉर कॉटन’ कार्यक्रमासाठी २५०० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पात प्रतिवर्षी ५०० कोटी रुपये गुंतवले जातील.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ‘मिशन फॉर कॉटन’ या विषयावर चर्चा झाली. पाच वर्षे कालावधी असलेल्या या प्रकल्पाकरिता तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रति वर्ष सरासरी ५०० कोटी रुपयांचा खर्च करीत कापसाच्या उत्पादकता व गुणवत्तेत सुधारणांचा उद्देश याद्वारे साधला जाणार आहे.

वेबिनारमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) त्यासोबतच प्रयोगशील शेतकरी, कापूस मूल्यवर्धन व उत्पादकता, गुणवत्ता सुधार या साखळीतील भागधारक सहभागी झाले होते. पाच वर्षे अंमलबजावणी होणाऱ्या या मिशनच्या माध्यमातून कापसाची उत्पादकता वाढ, दर्जा सुधार तसेच कस्तुरी ब्रॅण्ड कापसाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रक्रियात्मकस्तरावर देखील गुणवत्ता सुधारावी याकरिता देशभरातील एक हजार जिनिंग, प्रोसेसिंग युनिटचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

वेबिनारमधील चर्चेनुसार, देशात सद्यःस्थितीत सुमारे १३० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असताना उत्पादकतेच्या बाबतीत मात्र भारताची पिछाडी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अनेक उपाययोजनांची शिफारस मिशनच्या माध्यमातून करण्यात आली त्यामध्ये, कापसाची उत्पादकता २५ टक्‍क्यांनी वाढविण्यासाठी आणि फायबर गुणवत्तेत सुधारणांसाठी कीड-रोग आणि तणांना आनुवंशिकदृष्ट्या प्रतिकारक नवीन वाण विकसित करणे.

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्याचा देखील उत्पादकतेवर परिणाम होत असल्याने प्रतिकारक्षम वाण निर्मिती. अतिसघन कापूस लागवड हा उत्पादकता वाढीसाठी सक्षम पर्याय ठरला आहे. त्यासाठी कमी कालावधीचे, ताणाला सहनशील, तसेच उच्च उत्पादकता असलेले वाण विकसित करणे.

अतिसघन कापूस लागवडीत वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय पूरक ठरतो. अशा वेचणीकामी आवश्‍यक पानगळीकरिता डीफॉलिएंट रसायनांची उपलब्धता. फायबर गुणवत्तेसाठी लांब, सहनशील आणि मायक्रोनेअर अशा तीनही बाबींची पूर्तता करणारे वाण विकसित करणे. ४० टक्‍क्यांपेक्षा जास्त जिनिंग टक्‍केवारी असलेल्या सुधारित कापसाच्या जातींचा विकास त्यातून रुईची उत्पादकता वाढ.

कापसाच्या लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च कमी व्हावा याकरिता यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन, त्याकरिता अवजारे बॅंकांची उभारणी. कीड-रोग नियंत्रणासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर. हवामान विश्‍लेषण व मॅपिंग, सूक्ष्म सिंचन, कार्बन पॉझिटिव्ह शाश्‍वत उत्पादन, सेंद्रिय कापसासारख्या विशेष आणि ब्रॅण्डेड कापसासाठी नावीन्यपूर्ण मूल्यसाखळी, शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट यांसारख्या उपायांवर मिशनमधून भर देण्यात आला आहे.

‘मिशन फॉर कॉटन’ची अंमलबजावणी भागधारकांच्या सल्ल्यानुसार केली जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबविला जात यातून निश्‍चितच कापूस उत्पादकतेचा उद्देश साधला जाईल. तण आणि किडीला आनुवंशिकदृष्ट्या प्रतिकारक वाण विकसित करणे, यांत्रिकीकरण असे विविध टप्पे प्रकल्पात आहेत.
डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT