Cotton Productivity : कापूस उत्पादकता वाढीसाठी पूरक तंत्रज्ञान गरजेचे

Cotton Market : देशात कापसाखालील लागवड क्षेत्र अधिक आहे. त्या तुलनेत कापसाची उत्पादकता मात्र अपेक्षित नाही. कापसाची उत्पादकता वाढावी याकरिता गेल्या काही वर्षांत अपेक्षित प्रयत्नच झाले नाहीत.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : पिकाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्याकरिता उत्पादकता खर्च कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी म्हणून कीड-रोग त्याबरोबरच तणाच्या नियंत्रणाकरिता जीएम किंवा तत्सम तंत्रज्ञानाची उपलब्धता होण्याची गरज असल्याचे मत राशी सीड्स कंपनीचे संचालक एम. रामासामी यांनी व्यक्‍त केले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री इंडिया तसेच नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्‍त सहकार्याने शुक्रवारी (ता. ७) एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कापसाच्या उत्पादकता वाढीत अतिसघन कापूस लागवड पद्धतीचे योगदान या विषयावरील कार्यशाळेत श्री. रामासामी बोलत होते.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्‍ला, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपंसचालक (व्यावसायिक पिके) डॉ. प्रशांता दास, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे उपसंचालक डॉ. ए. एल. वाघमारे यांच्यासह देशभरातील तज्ज्ञांची या वेळी उपस्थिती होती.

Cotton Production
Cotton Market: कापूस बाजार स्थिर! खासगी बाजारात दर ७२०० रुपयांवर

एम. रामासामी म्हणाले, ‘देशात कापसाखालील लागवड क्षेत्र अधिक आहे. त्या तुलनेत कापसाची उत्पादकता मात्र अपेक्षित नाही. कापसाची उत्पादकता वाढावी याकरिता गेल्या काही वर्षांत अपेक्षित प्रयत्नच झाले नाहीत. आता उत्पादकता वाढीसाठी अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. या माध्यमातून एकरी कापसाच्या झाडांची संख्या वाढविण्याच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचा उद्देश साधला जाणार आहे.

या लागवड तंत्राचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडून या प्रकल्पाचा विस्तार पूर्वीच्या आठ राज्यांतून ११ राज्यांत करण्यात आला आहे. ही बाब निश्‍चितच दिलासादायक असली तरी एवढ्यावरच मर्यादित न राहता कापसातील कीड-रोग नियंत्रण हे देखील आव्हानात्मक ठरत आहे.

Cotton Production
Cotton Market : शेतकऱ्यांनो सावधान! अनधिकृत खरेदीदारांना कापूस विक्री टाळा

त्याकरिता जीएम तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे. कापूस पिकात मजुरांद्वारे होणारे तण नियंत्रण देखील वेळखाऊ आणि अधिक खर्ची आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एचटीबिटीला परवानगी देण्याची गरज आहे.’

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्यासह ऑनलाइन पद्धतीने नॅशनल सीड्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एम. प्रभाकरराव यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी प्रतिनिधी म्हणून अकोला येथील दिलीप ठाकरे, दिलीप पोहाणे, त्र्यंबक ठेंगे, मिलींद दामले यांनी विचार मांडले.

जीएम तंत्रज्ञानानंतरच वाढली उत्पादकता

कापूस शेतीत नव्या तंत्रज्ञानासोबतच लागवड पद्धतीत बदलही गरजेचा आहे. उत्पादकतेत ५० टक्‍के वाटा हा दर्जेदार बियाण्यांचा राहतो तर उर्वरित ५० टक्‍के हिस्सा हा लागवड व व्यवस्थापन तंत्र यावर अवलंबून आहे.

त्यामुळे या दोन्ही बाबी विचारात घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी या वेळी व्यक्‍त केले. देशात जी.एम. तंत्रज्ञान आल्यानंतर कापसाची उत्पादकता ३६० लाख गाठींवर पोहोचली होती. त्यानंतर मात्र सातत्याने उत्पादकतेत घट नोंदविली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com