Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : वेतनत्रुटीविरुद्ध कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाने के. पी. बक्षी वेतन त्रुटी निवारण समितीने कृषी विभागावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ३) धरणे आंदोलन जाहीर केले होते.

Team Agrowon

Akola Protest News : कृषी विभागातील (Agriculture Department) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीबाबत घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करीत जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Agriculture Officials Protest) केले.

महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाने के. पी. बक्षी वेतन त्रुटी निवारण समितीने कृषी विभागावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ३) धरणे आंदोलन जाहीर केले होते.

यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे, आत्मा प्रकल्प संचालक आरिफ शाह, एसडीओ के. बी. खोत, उपसंचालक संध्या करवा, तंत्र अधिकारी ज्योती चोरे, शेंडे, प्रशासन अधिकारी प्रशांत देशमुख, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर, विलास वाशीमकर, कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, संजय अटक, महादेव राऊत यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

कृषी विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, स्मार्ट प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, मग्रारोहयो, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, पीकविमा योजना अशा योजना राबवत आहे.

किंबहुना सर्व योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी कृषी विभागाने केली आहे. केंद्र शासनाने २०१६-१७ मधील अन्नधान्य उत्पादनातील कार्यासाठी राज्यास ‘कृषी कर्मण पुरस्कार’, जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यासाठी २०१८-१९ मध्ये केंद्र शासनाने राज्याचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ देऊन गौरव केला.

तसेच २०२२ या वर्षाकरिता ‘महापरवाना’ या ऑनलाइन प्रणालीस स्कॉच संस्थेचे ‘रौप्य पदक’ जाहीर झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Procurement: भाताच्या सरकारी खरेदीला वेग, साठा १२ टक्क्यांनी वाढला, अधिक निर्यातीची संधी

Boat Manufacturing Industry: लाकडाच्या बोटी कालबाह्य

Siddheshwar Agriculture Exhibition: सोलापुरात २५ डिसेंबरपासून ‘श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन’

CM Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून शेतरस्त्यांना राजाश्रय

Mahavistar App: महाविस्तार ॲप वापरण्यात अकोले खुर्द राज्यात टॉप

SCROLL FOR NEXT