Agriculture Department Protest agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Protest : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर कोल्हापुरात ठिय्या आंदोलन

Agriculture office in Kolhapur : कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले.

sandeep Shirguppe

Kolhapur : कोल्हापूर विभागातील कृषी सहायकांनी आंदोलन अधिक तीव्र करताना बुधवारी (ता. २१) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या मांडला. कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले.

ऐन खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना गरज असतानाही हा संप शासन लवकर मिटवत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत यातून शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, असा आमचाही प्रयत्न आहे.

शासनानेही याबाबत ठोस आश्वासन देऊन मागण्यांबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी तिन्ही जिल्ह्यांतील कृषी सहायक संघटनांच्या वतीने करण्यात करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप गावडे, कार्याध्यक्ष अमोल टिपुगडे, कोषाध्यक्ष महादेव जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम खरमाटे, विभागीय सचिव संदीप कांबळे, माजी राज्याध्यक्ष संदीप केवटे आदींसह तिन्ही जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकरी अनुदानासाठीचे  ४८ लाख अर्ज पडून

Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Maharashtra Heavy Rain: घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरी शक्य

SCROLL FOR NEXT