Crop Insurance Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Protest : मोताळा तहसीलवर पीकविम्यासाठी मोर्चा

Crop Insurance Demand : मोताळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविम्याचा लाभ द्यावा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. २५) मोताळा येथील पीकविमा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यातच आला.

Team Agrowon

Buldhana News : मोताळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविम्याचा लाभ द्यावा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. २५) मोताळा येथील पीकविमा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यातच आला. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सांगळद नजीक असलेल्या पीकविमा कार्यालयावर धडक दिली.

पीकविमा कंपनी तालुका प्रतिनिधी व कृषी विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. दरम्यान, मागील खरीप हंगामातील पीकविम्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

यात तालुक्यातील मोजक्याच शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वेळोवेळी शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविम्याच्या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळेल, असे आश्‍वासन दिले होते. परंतु आता मोजक्याच शेतकऱ्यांना पात्र दाखवून तालुक्यातील शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पीकविम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मोर्चाचे नेतृत्व प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके, गणेशराव पाटील, तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर कुळे, विजयसिंग राजपूत यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT