Budget Session Maharashtra Agrowon
ॲग्रो विशेष

Budget Session Maharashtra : कापसाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Budget Session Maharashtra 2024: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवार (ता.२८) तिसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवार (ता.२८) तिसरा दिवस आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. हातात गाजरे, गळ्यात कापसाच्या माळा घालून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह विरोधक आमदार उपस्थित होते. 

सरकारचा निषेध

अधिवशेनाच्या आजच्या तिसरा दिवसी अर्थसंकल्पावर विस्तारित चर्चा होणार आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारने हमीभावाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तसेच गळ्यात कापसाच्या माळ्या व हातात गाजर घेत विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे.

कापसाला भाव

यावेळी, कापसाला १४ हजार रुपये प्रति क्क्विंटल भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. तसेच याच मागणीचा बॅनर हातात घेऊन विरोधकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विधानभवना जवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना विरोधकांनी कापसाला भाव, घ्या गाजर!, भाताला भाव, घ्या गाजर!, सोयाबीनला भाव, घ्या गाजर!, संत्र्याला भाव, घ्या गाजर! अशी जोरदार घोषणाबाजी केली. 

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी मंगळवारी (ता.२७) देखील अशीच जोरदार घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली होती. 

कांदा उत्पादक अडचणीत

दरम्यान राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी जेरीस आलेला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. कॉँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत नुकसान भरपाईवरून सरकारवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, "पंचनाम्यांची प्रक्रिया किचकट आहे. त्याऐवजी सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत करण्यात येईल, असं आश्वासन दिलं.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आधीच केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस आणि कांदा शेतमालाचे दर पडलेले आहेत. त्यात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. तसेच कापूसाला प्रतिक्विंटल १४ हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. या मागणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT