Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest : शक्‍तिपीठ महामार्गाविरोधात कोल्‍हापुरात सोमवारी आंदोलन

Farmer Protest : बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांवर अन्याय करत, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा, पर्यावरणास हानी पोहोचवणारा व कंत्राटदारांचे खिसे भरणारा गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग महायुती शासन पुढे रेटत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांवर अन्याय करत, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा, पर्यावरणास हानी पोहोचवणारा व कंत्राटदारांचे खिसे भरणारा गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग महायुती शासन पुढे रेटत आहे. या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. १२) महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीची ५९ गावच्या शेतकरी प्रतिनिधींची बैठक बुधवारी (ता.७) येथे झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील व समन्वय गिरीश फोंडे यांनी ही माहिती दिली.

याबाबत श्री. पाटील व श्री. फोंडे म्हणाले, की शक्तिपीठ महामार्ग म्हणजे महाराष्ट्र सरकारची ‘लाडका कंत्राटदार’ योजना आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूरसहित इतर बारा जिल्ह्यांमध्ये शेतकरी व नागरिक हे शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आंदोलन करत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी हा महामार्ग रद्द न करता व शेतकऱ्यांना कोणत्याही चर्चेला न बोलवता तोंडी स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते, पण त्यांचा खोटेपणा हा काही दिवसांतच उघड झाला आहे.

विधानसभेमध्ये देखील मंत्री दादा भुसे हे सपशेल खोटे बोलले आहेत, हे स्पष्ट होते. कारण ज्या दिवशी वर्तमानपत्रातून या महामार्गाला स्थगिती दिली आहे, असे जाहीर करण्यात आले होते तेव्हापासूनच गावागावांमध्ये भूसंपादनाच्या नोटीस चावडीमध्ये यायला सुरूच होत्या.

श्री. पाटील व श्री. फोंडे म्हणाले, की महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत व शेतकऱ्यांना एकीकडे स्थगिती दिली आहे, असे सांगत व दुसरीकडे त्यांना अंधारात ठेवत महामार्ग रेटण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवली आहे.

याबद्दल कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करत आहोत. या वेळी शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, के. डी. पाटील, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, युवराज पाटील, नितीन मगदूम, तानाजी भोसले, युवराज शेटे, नवनाथ पाटील, कृष्णा भारतीय, श्रीपाद साळे, अजित बेले पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT