Devendra Fadanvis agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadanvis : ‘शक्तिपीठ’चे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध; संघर्ष समिती आक्रमक

Kolhapur Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करण्यात आला. हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरुच राहील, असा इशारा समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

sandeep Shirguppe

CM Devendra Fadanvis : मुंबई येथे शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी(ता.०५) माध्यमांशी बोलताना शक्तिपीठ महामार्ग होणार असे सांगितल. याचा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करण्यात आला. हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरुच राहील, असा इशारा समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हंटले आहे की, या महामार्गास नागपूरपासून सांगलीपर्यंत विरोध नाही. पण कोल्हापूरचा विरोध आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पर्यायी मार्ग काढू, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. हा महामार्ग रद्द होण्यासाठी दहा जिल्ह्यातील शेतकरी फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. फडणवीस हे त्यावेळी गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांना आंदोलनाची खडानखडा माहिती आहे. त्यांनी या दहा महिन्यात यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केलेली नाही.

आता ही ते चर्चा करु असे खोटे बोलत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके वगळण्याचा आदेश महायुती सरकारने काढला होता, याचा साधा उल्लेख त्यांनी केलला नाही. याचे उत्तर महायुतीच्या जिल्ह्यातील १० आमदारांना द्यावे लागणार आहे असे फोंडे यांनी पत्रकाद्वारे भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्ण समर्थन आहे. या भागापर्यंत बाधित शेतकरी स्वतः भूसंपादन करा असे आमच्याकडे सांगत येत आहेत. पण, कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो, तिथे खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आमचा असा प्रयत्न असेल की, ज्या भागापर्यंत विरोध नाही. तिथपर्यंतची अलाइनमेंट पूर्ण करायची आणि पुढचे काम जे आहे, ते सगळ्यांशी चर्चा करून पुढे न्यायचे. शेतकऱ्यांना नाराज करून, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस पुढे म्हणाले, काही पर्यायी रस्ते तयार करता येतील का किंवा आता जो महामार्ग आहे, त्याला शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा एखादा उन्नत मार्ग बांधून त्यातून पर्याय काढता येईल का, असा चर्चेतून मार्ग काढू.

समृद्धी महामार्गामुळे म्हणजेच नागपुर-मुंबई प्रवेश नियंत्रित महामार्गामुळे ज्याप्रमाणे विदर्भाचे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे चित्र बदलले आहे त्याच धर्तीवर संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT