Minister Anil Bonde Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agricultural : भौगोलिक मानांकनाचे प्रस्ताव अडकले लालफीतशाहीत

अमरावती जिल्ह्यात पानपिंपळी या औषधी गुणधर्म असलेल्या पिकाची लागवड होते. याचा वापर चार औषधींमध्ये केला जातो.

Team Agrowon

Amravati News : वनौषधी गुणधर्म असलेली पानपिंपळी आणि खारपाणपट्ट्यातील हरभरा या दोन पिकांच्या भौगोलिक मानांकनाचे प्रस्ताव कृषी विभागाकडे (Agricultural Department) दाखल करण्यात आले आहेत.

त्या संदर्भातील प्रक्रियेला गती देत या दोन्ही पिकांच्या भौगोलिक मानांकनाचा प्रश्‍न निकाली काढावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांना पत्राद्वारे केली आहे.

कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रूरल डेव्हलपमेंट (कार्ड) या संस्थेच्या मागणीची दखल घेत हा पत्रव्यवहार करण्यात आला.

पत्रानुसार, भौगोलिक मानांकन असलेल्या पीक, वस्तूंना विशिष्ट दर्जा आणि ओळख मिळते. संबंधित शेतीमालाच्या गुणवत्तेवरही यातून शिक्‍कामोर्तब होते. निर्यातीला चालना मिळत परकीय चलन प्राप्तीचाही हा पर्याय ठरतो.

त्यामुळे नजीकच्या काळात त्या भागातील खास वैशिष्ट्य जपणाऱ्या शेतीमालाला जीआय मानांकन मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.

अमरावती जिल्ह्यात पानपिंपळी या औषधी गुणधर्म असलेल्या पिकाची लागवड होते. याचा वापर चार औषधींमध्ये केला जातो.

त्यासोबतच मसाले पिकामध्येही याचा उपयोग होतो. त्यासोबतच अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत खारपाणपट्टा आहे. या भागात पाण्याची मुबलकता असली, तरी त्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा शेतीकामी उपयोग शक्‍य होत नाही.

मात्र याच भागात उत्पादित हरभऱ्याला विशिष्ट चवीमुळे उत्तर भारतातून सर्वाधिक मागणी राहते. चवीच्या या गुणवैशिष्ट्यामुळे भौगोलिक मानांकन मिळाल्यास बाजारपेठेचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे.

या दोन्ही पिकाच्या जीआय (जिओग्राफीकल इंडिकेशन) संदर्भातील प्रस्ताव कार्ड संस्थेमार्फत कृषी विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत.

२६ ऑक्टोबर २०२२ रोजी हे प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यासंदर्भातील प्रक्रियेला गती देत मानांकनासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा डॉ. बोंडे यांनी पत्रातून व्यक्‍त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mineral Development Fund: दोन कोटी रुपयांचे निविष्ठा प्रकरण गाजणार विधिमंडळात

Onion Price Issue: आठ रुपयांत कांदा विकायचा तरी कसा? शेतकरी हवालदिल

Digital Greetings: शुभेच्छा उदंड,पण ओलावा...?

Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणामुळे भारतीय शेतीचे चित्र बदलेल?

Sahyadri Wildlife: वाघांमुळे मिळेल पर्यटनाला चालना

SCROLL FOR NEXT