
केंद्र सरकार सातत्याने शेतीच्या उन्नतीसाठी काम करत आहे. देशातील तरुण शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आणि ग्रामीण भाग समृद्ध करण्यासाठी योगदान देतील, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी तरूणांना केले.
जयपूर येथील चौधरी चरणसिंग इंस्टिट्यूट ऑफ अॅग्रीकल्चर मार्केटिंग महाविद्यालयात ते बोलत होते.
कृषिमंत्री तोमर यांनी अॅग्री इनोव्हेशन आणि इनक्यूबेशन सेंटरचेही उद्घाटन केले.
यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी उपस्थित होते. तसेच माजी केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंग राठोर, खासदार रामचरण बोहरा आणि कृषी मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशातील कृषी स्टार्टअप्सला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. २०१४ मध्ये देशात एकूण ३२ स्टार्टअप्स होते.
आता त्यांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. यामध्ये कृषी स्टार्टअप्सने दोनशेचा आकडा ओलांडला आहे, असा दावाही यावेळी तोमर यांनी केला.
पुढे ते म्हणाले, "शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांचे अथक प्रयत्न आणि शेतकऱ्यांच्या शेतकरी हिताच्या धोरणांमुळे कृषी क्षेत्राची अभूतपूर्व अशी प्रगती झाली आहे.
जगाला भारताकडून अन्नधान्य क्षेत्रात मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आजवर आपण पूर्ण करत आलो आहोत. आणि भविष्यातही पूर्ण करत राहू."
शेतमाला विना सगळं काही ठप्प होईल. कृषी क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. त्यावर काम करण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञान आणि राज्य सरकारच्या मदतीच्या अपेक्षा करत आहे.
जेणेकरून या आव्हानातून मार्ग काढता येऊ शकेल, असा विश्वासही तोमर यांनी यावेळी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.