Uday Samant Agrowon
ॲग्रो विशेष

Uday Samant : ॲग्री कॉलेज, फणस केंद्राला लवकरच मान्यता

Approval of the proposal by the Government : कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचे प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्यता देण्यात येईल, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचे प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्यता देण्यात येईल, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच सिंधुरत्न योजनेमधून दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी दिले जातील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

लांजा तालुक्यातील गवाणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सामंत बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक डॉ. प्रमोद सावंत, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. प्रकाश शिनगारे, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. रेशीम उद्योगाबाबत व्यापक बैठक आयोजित केले आहे. महिला, युवक यांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत.

कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे. कोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करुन शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांना कर्जमुक्त बनवावे, असे मार्गदर्शन करावे.

कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत. या प्रसंगी कुलगुरू डॉ. भावे म्हणाले, की बांबूवर काम होणे आवश्यक आहे. १० हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर, आयात करायची आवश्यकता भासणार नाही. प्रास्ताविकेत डॉ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठाचा इतिहास आणि सद्यःस्थिती सांगितली. या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

Rural Development : सुंदर गाव योजनेमध्ये कुरगावने मारली बाजी

Rasta Roko Protest : वडखळ-अलिबाग राज्यमार्ग दीड तास ठप्प

India Trade Policy: टॅरिफ बनले शस्त्र, पण भारत कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, अन्न सुरक्षेबाबत कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

SCROLL FOR NEXT