Meeting in Ministry Agrowon
ॲग्रो विशेष

Fund Demand : महिला कृषी महाविद्यालयांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव पाठवा

Dhananjay Munde : नवीन महिला कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव अर्थ विभागास सादर करण्याचे आदेश या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नाही. नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव अर्थ विभागास सादर करण्याचे आदेश या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथील अडीअडचणी दूर करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ २ कोटी निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेशही कृषिमंत्री मुंडे यांनी दिले.

नारायणगाव ‘केव्हीके’त आजपासून कृषी महोत्सवया वेळी या बैठकीस आमदार सतीश चव्हाण चव्हाण, आमदार रमेश कराड, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे संचालक हेमंत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी सदस्य गोविंदराव देशमुख तसेच मंत्रालयातील विविध अधिकारी उपस्थित होते.

जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करा

कृषी विभागाने गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद येथे आले संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उपलब्ध असणारी विद्यापीठाची जमीन अपुरी आहे. त्यामुळे पळसवाडी येथील जमीन या प्रकल्पासाठी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification : सिंचन वाढलं, पण भरडधान्यं-कडधान्यं गायब झाली; शिवराजसिंह चौहान यांचं प्रतिपादन

Abhijeet Dipke Meets Manoj Jarange Patil: जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न सरकारने करु नये, अभिजित दिपकेंचा इशारा, मनोज जरांगेंची घेतली भेट

Veterinary College Fee: पशुवैद्यकीय प्रवेश शुल्क तिढ्यात रखडले

Sugarcane Crushing Area: ऊस क्षेत्राचा होणार फेरआढावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Seed Bill : बियाणे विधेयकाच्या मसुद्यावर पुन्हा चर्चा; केंद्र सरकारला १८ हजार सूचना

SCROLL FOR NEXT