Agriculture Festival : नारायणगाव ‘केव्हीके’त आजपासून कृषी महोत्सव

Gramonnati Mandal Krushi Vidnyan Kendra : ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन ८ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आलेले आहे.
Global Agriculture Festival
Global Agriculture Festival Agrowon

Narayangaon News : ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन ८ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, पीक प्रात्यक्षिकाचे उद्‌घाटन सहकारमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी (ता.८) होणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील, पीडीसीसी बँक पुण्याचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पीडीसीसी बँकेचे संचालक अॅड. संजय काळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Global Agriculture Festival
Agricultural Technology Festival : सगरोळीत उद्यापासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव

कृषी विज्ञान केंद्राच्या ८० एकर प्रक्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, परसबाग, पोषण बाग, नैसर्गिक शेती पीक प्रात्यक्षिके व निविष्ठा निर्मिती, विविध फळ, फूल व भाजीपाला पिकांचे डेमो चायनीज भाजीपाला पिकातील विविध नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके, चारापिके, परसबागेतील कोंबडी पालनाच्या विविध जाती, तृणधान्य पिकांचे प्रात्यक्षिके बघण्याची उपलब्ध होणार आहे.

ड्रोनद्वारे सेंद्रिय निविष्ठा फवारणी पाहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विविध दालने, कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना कृषिविषयक उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण शेतीतील बाबी प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन इत्यादींची माहिती दिली जाणार आहे. कृषी विषयक परिसंवाद, उद्योजकांची व्याख्याने, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ व विचारवंतांची भेट प्रदर्शनातून होणार आहे.

Global Agriculture Festival
Agriculture Festival : जिल्हा कृषी महोत्सवासाठी प्राधान्याने नियोजन करा

विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार

आज (गुरुवारी, ता. ८) दुपारी २ वाजता शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शासनाच्या विविध योजना व शेतकऱ्यांसाठी बँकेच्या विविध योजना.

शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान वा नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे घटक आणि महत्त्व, आयुर्वेदिक पशू उपचार पद्धती, दु. २ वाजता शाश्वत ऊस उत्पादनासाठी हवामान अद्ययावत खोडवा निडवा व्यवस्थापन.

१० तारखेला सकाळी ११ वाजता मिलेट आहारातील महत्त्व व व्यावसायिक संधी आणि दुपारी २ वाजता कांदा आणि टोमॅटो उत्पादनाविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

धान्य महोत्सवाचे खास आकर्षण

कृषी प्रदर्शनात धान्य महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी वेगवेगळ्या सेंद्रिय डाळी, विविध भरडधान्याची विक्री या ठिकाणी होणार आहे. तसेच महिला बचत गटामार्फत तयार केलेले लोणचे, पापड, मसाले, कुरडई, पापड्या, मिलेट्‌सचे विविध पदार्थ आदी गोष्टी तसेच खवयांसाठी व्हेज-नॉनव्हेज उपलब्ध असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com